Sharad Pawar on Maratha Reservation : सरकार बघ्याची भूमिका घेते का ?; शरद पवार यांचा मराठा आरक्षणप्रकरणी थेट प्रश्न

Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी दौऱ्यावर असताना शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांच्यावर टीका केली. या टीकेला शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना त्यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारवर टीका केली.

172
Sharad Pawar on Maratha Reservation : सरकार बघ्याची भूमिका घेते का ?; शरद पवार यांचा मराठा आरक्षणप्रकरणी थेट प्रश्न
Sharad Pawar on Maratha Reservation : सरकार बघ्याची भूमिका घेते का ?; शरद पवार यांचा मराठा आरक्षणप्रकरणी थेट प्रश्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे. (Sharad Pawar on Maratha Reservation) “महाराष्ट्र सरकारने आणि केंद्राने एकत्र बसून मराठा समाज प्रश्न सोडवला पाहिजे. सरकार बघ्याची भूमिका घेतात का ? असा प्रश्न मला पडला आहे. कारण अजून कोणतीच पावलं उचलली नाहीत”, असं शरद पवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी दौऱ्यावर असताना शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांच्यावर टीका केली. या टीकेला शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना त्यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारवर टीका केली. (Sharad Pawar on Maratha Reservation)

(हेही वाचा – M S Dhoni : महेंद्रसिंग धोनीने दिले आयपीएल २०२४ मध्ये खेळण्याचे संकेत)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देतांना शरद पवार यांनी २००४ ते २०१४ या काळात कृषीमंत्री असताना घेतल्या निर्णयांची यादीच पत्रकार परिषदेत वाचून दाखवली. शरद पवार म्हणाले, ”प्रधानमंत्री हे पद संविधानिक आहे. त्यामुळे त्या पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. मी त्यांच्यावर टीका करणार नाही. मात्र त्यांचे वक्तव्य वास्तवावर आधारित नव्हते.” (Sharad Pawar on Maratha Reservation)

पंतप्रधान मोदी मराठा आरक्षणावर काहीच बोलले नाहीत, याबाबत बोलताना पवार म्हणाले, ”त्यांना ज्याची भिती वाटते, ते त्याबाबत बोलले.” पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी अजित पवारांच्या बारामतीतील रद्द झालेल्या दौऱ्यावरही भाष्य केले आहे. अजित पवार यांनी माळेगावला जाणे टाळले, हे योग्य आहे. वातावरण गरम असताना तिथे न जाणे हेच योग्य आहे, असे शरद पवार म्हणाले.  (Sharad Pawar on Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.