राज्यभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे कोल्हापुरचे उमेदवार संजय पवार यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभेच्या निकालाने मला धक्का बसला नाही. आमच्याकडे पुरेसा कोटा होता. त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला मते मिळाली आहेत. सहाव्या जागेसाठी मोठा गॅप होता. सहाव्या जागेसाठी उद्धव ठाकरेंनी मोठी रिस्क घेतली. राजकारणात रिस्क घ्यावीच लागते. तरीही सहाव्या उमेदवाराने चांगली मते मिळवली, असे शरद पवार यांनी सांगितले.
पुणे येथे शरद पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधताना म्हटले की, मतांची संख्या पाहिली शिवसेना, राष्ट्रवादी, काॅंग्रेसची मते फुटली नाहीत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार प्रफुल पटेल यांना एक मत अतिरिक्त मिळाले, याची मला कल्पना असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
( हेही वाचा: Rajya Sabha Election: महाराष्ट्रात भाजपचा मविआला धक्का; तर इतर राज्यांचे असे आहेत निकाल )
हा चमत्कार मान्य करावा लागेल
सहाव्या जागेसाठी दोन्ही बाजूकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. भाजपला आम्हाला पाठिंबा देणा-या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात यश आले. त्यामुळे हा निकाल लागला. हा चमत्कार मला मान्य करावे लागेल असेही त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहका-यांना विविध मार्गाने या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात यश आले असल्याचे पवार यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community