राज्याच्या राजधानीतून Sharad Pawar गट होणार हद्दपार?

115
राज्याच्या राजधानीतून Sharad Pawar गट होणार हद्दपार?
  • खास प्रतिनिधी 

महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी मुंबईत तीन दिवस बैठक ‘बीकेसी’मधील सोफीटेल हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत मुंबईतील जागांवर काँग्रेस आणि शिवसेना उबाठामध्ये रस्सीखेच सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गट शांत असल्याने मुंबईतून शरद पवार गट हद्दपार होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

(हेही वाचा – Narendra Modi Salary : पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती पगार मिळतो? त्यांचे भत्ते, सुविधा किती?)

मागणी सात जागांची

मुंबईतील ३६ विधानसभा जागांसाठी काँग्रेस आणि उबाठा यांच्यात एकमत होत नाही. उबाठाने ३६ पैकी २२-२३ जागांची मागणी केली असून काँग्रेस १६-१८ जागांची मागणी करत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला या चर्चेत मुंबईतील किती जागा मिळणार यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाची ताकद नसली तरी या गटाने ७ जागांची मागणी पुढे केली आहे. मात्र जिथे काँग्रेस आणि उबाठामध्येच एकमत होत नाही तिथे शरद पवार गटाला किती जागा मिळणार, असा सवाल केला जात आहे.

(हेही वाचा – Maharashtra Politics : उबाठा नेत्याची खासदारकी धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात)

भाजपा आमदार असलेल्या जागा नको

काँग्रेस आणि उबाठा यांच्यात ६-७ जागांवर वाद आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत, त्या जागा दोन्ही पक्ष टाळण्याचा प्रयत्न करत आहेत तर ज्या जागांवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि शिवसेना (एकसंघ) एकमेकांविरुद्ध लढले त्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्षांचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते. मलबार हिल, विले पार्ले, कांदिवली, बोरिवली अशा भाजपाचा किल्ला असलेल्या जागांवर विजयाची खात्री नसल्याने त्या सोडून अन्य जागांसाठी वाद सुरू असल्याचे समजते. (Sharad Pawar)

(हेही वाचा – Me Savarkar : स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘मी सावरकर’ या अभिनव वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन)

राजधानीत एकही प्रभावी चेहेरा नाही

अखेर मुंबईत शिवसेना उबाठा २०-२२, काँग्रेस १३-१५ आणि राष्ट्रवादी (शप) गट १-२ जागा लढण्यावर महाविकास आघाडीत एकमत होऊ शकते, असे महाविकास आघाडीतील एका नेत्याने सांगितले. त्यामुळे या जागावाटपात राष्ट्रवादी शरद पवार गट मुंबईतून हद्दपार होईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. २०१९ मध्ये मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक हे एकमेव आमदार निवडून आले होते, यावेळी त्यांनी अजित पवार यांची साथ दिल्याने राष्ट्रवादीकडे राज्याच्या राजधानीत एकही प्रभावी चेहेरा नसल्याचे स्पष्ट होत आहे. (Sharad Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.