माझ्याबद्दल पोस्ट केली आहे, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही आणि ज्यांचे नाव घेतले जात आहे, ती व्यक्ती कोण आहे, तिला मी ओळखतही नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार यांच्यावर टीका करणारी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल केल्यानंतर राज्यभर संताप निर्माण झाला आहे. तिच्या विरोधात राज्यात तीन ठिकाणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनीही तिला अटक केली आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी, ,मागील ३-४ दिवसांपासून आपल्यावर टीका केली जात आहे, याची कल्पना आहे, पण ही केतकी चितळे कोण आहे, मी तिला ओळखत नाही, असेही पवार म्हणाले.
(हेही वाचा अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात)
ओवैसीचा निषेध
महाराष्ट्राचा, देशाचा इतिहास सर्वांना माहित आहे. औरंगजेब याने त्याच्या कालखंडात काय केले होते हे माहित असताना जाणीवपूर्वक राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याचा निषेध केला पाहिजे, असेही पवार यांनी एमआयएमचे अध्यक्ष ओवैसी यांनी औरंगजेब याच्या कबरीवर डोके टेकले त्यावर भाष्य केले. राज्यातील महाविकास आघाडीचे ५ वर्षे पूर्ण करेलच, तसेच पुढील ५ वर्षीही राहील असेही पवार म्हणाले. त्यामुळे सरकार अमुक दिवशी पडेल असे नारायण राणे, चंद्रकांत पाटील कायम बोलतात ते ऐकतो आणि आम्ही त्याचा आनंद घेतो, असेही पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community