Sharad Pawar : सुप्रिया सुळे आणि अजित पवार बहीण-भाऊ, त्यांच्या बोलण्याचा राजकीय अर्थ काढू नका – शरद पवार

112

राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार आमचेच नेते आहेत, असे पक्षात फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते, जेव्हा पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, अशी स्थिती इकडे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे, असे विधान शरद पवार Sharad Pawar यांनी केले. शरद पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र या विधानाला अवघे काही तास झाले असताना शरद पवारांनी पुन्हा एक नवीन विधान केले, शरद पवार म्हणाले की, अजित पवार आमचे नेते आहेत, असे मी म्हणालो नाही. सुप्रिया सुळे त्यांची धाकटी बहिण आहे. बहिण भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.

शरद पवार Sharad Pawar मोठे नेते आहेत, अजित पवारांची घरवापसी होईल, एकदा पहाटेचा शपथ विधी झाला होता. दोन लोकांचा हा शपथविधी होता. त्यात आमचेही एक सहभागी होते. त्यावेळी आम्ही निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी माझ्याकडून जे झालं ते योग्य नव्हतं, आता त्या मार्गाने जाणार नाही असे त्यांनी म्हटले होते. त्यावेळी आम्ही त्यांना संधी दिली. त्यामुळे आता संधी वारंवार मागायची नसते आणि मागितली तरी ती द्यायची नसते, असे सांगत शरद पवारांनी अजित पवारांबाबतची आपली ठाम भूमिका मांडली आहे.

(हेही वाचा Chhagan Bhujbal : … तर शरद पवारांनी आम्हाला समर्थन द्यावे; छगन भुजबळांनी वेळ साधली)

दरम्यान, शरद पवारांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया आघाडी काही फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेपुरती मर्यादित नसून देशपातळीवर आहे. शरद पवारांच्या Sharad Pawar वक्तव्याचा इंडिया आघाडीवर परिणाम होणार नाही. मात्र संभ्रम निर्माण होऊ शकतो. आम्ही आमची भूमिका अमच्या पक्ष प्रमुखाकडे सातत्याने मांडल्या आहेत. राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत आम्ही पक्षप्रमुखाकडे विचार मांडत असतो, असे अंबादास दानवे यांनी स्पष्टपणे सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.