आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवेल; शरद पवारांची माहिती

91

आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवेल असे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. २०२४ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस एकत्र तयारी करत आहेत असेही शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. एकत्र निवडणुका लढवण्याच्या रणनीतीवर चर्चा सुरू आहे अंतिम निर्णय झालेला नाही असेही ते म्हणाले. शरद पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला.

( हेही वाचा : विमानात एअर होस्टेससोबत गैरवर्तन, अश्लील भाषेत संवाद; DGCA कडे तक्रार)

एकत्र निवडणूक लढवताना फार अडचण येणार नाही – शरद पवार 

आगमी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका या कॉंग्रेस – राष्ट्रावादीने लढवाव्यात अशी इच्छा आहे दरम्यान रणनीतीवर चर्चा झालेली नाही. पण एकत्र निवडणूक लढवताना फार अडचण येणार नाही असेही पवार म्हणाले. सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. काही आमदार – खासदार इकडून तिकडे गेले असतील तरी येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनतेच्या भावना लक्षात येतील असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान शरद पवारांना शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारीत पडणार असा दावा संजय राऊतांनी केला आहे यावर प्रश्न करण्यात आला. यावेळी पवार म्हणाले, मला याबाबत माहिती नाही मी मुंबईला गेल्यावर संजय राऊतांशी बोलेन आणि जाणून घेईन असे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.