गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चर्चेत आहे. शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर (Sharad Pawar Resigns) केल्यानंतर आता पक्षाच्या अध्यक्षपदी कोण असणार यावरून चर्चा रंगत आहेत. अशातच शुक्रवार ५ मे रोजी अध्यक्षपदाचा निकाल जाहीर होणार आहे. त्यासाठी सकाळी ११ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बैठक होणार आहे.
मंगळवार २ मे २०२३ रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अचानक आपल्या निवृत्तीची (Sharad Pawar Resigns) घोषणा केली. ही गोष्ट खूप अनपेक्षित असल्याने संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळातून या निर्णयाचे पडसाद उठतांना दिसत आहेत.
(हेही वाचा – Sharad Pawar : शरद पवार निवृत्त नव्हे, तर प्रवृत्त झालेत)
शरद पवार (Sharad Pawar Resigns) यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा यासाठी अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. काही कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे, तर काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहून राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. या सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी स्वतः शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर येऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्याशी संवाद साधत ‘मी तुमच्या भावनांचा आदर करतो असे सांगितले.’
हेही पहा –
दादांना डावलून ताईच्या हाती सत्ता?
शरद पवार (Sharad Pawar Resigns) यांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्र नेमकी कोणाच्या हातात जाणार यावर चर्चा रंगल्या होत्या. अजित पवार, सुप्रिया सुळे, (Supriya Sule) जयंत पवार आणि प्रफुल्ल पटेल या चार नावांची चर्चा रंगली असतांना बुधवार ३ मे रोजी सकाळपासून सुप्रिया सुळे या नावाची चर्चा अधिक रंगू लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि अजित पवार यांच्यात या विषयावरून चर्चा झाली. आता सुप्रिया ताई यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का, की ही अध्यक्षपदाची शर्यंत आणखी कोणते नवे वळण घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
तसेच छगन भुजबळ यांनी राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे असं समीकरण मांडलं आहे. त्यामुळे आज शुक्रवार ५ मे रोजी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Sharad Pawar Resigns)
Join Our WhatsApp Community