शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचे सूतोवाच केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या घोषणेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरे यांच्या स्वबळाच्या भूमिकेवर चर्चा झाली असून, ते फार टोकाची भूमिका घेतील असं मला वाटत नाही,” असे पवार म्हणाले. (Sharad Pawar)
अंधेरी येथे शिवसेना (उबाठा) आयोजित मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या घोषणेबाबत शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपले मत व्यक्त केले. “उद्धव ठाकरे दोन दिवसांपूर्वी माझ्याकडे आले होते. आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी काल जे वक्तव्य केलं, ते त्यांचं मत आहे. मात्र, या मुद्द्यावर ते फार टोकाची भूमिका घेतील असे वाटत नाही,” असे पवार म्हणाले. (Sharad Pawar)
(हेही वाचा- World’s 50 Best Sandwiches : वर्ल्ड्स ५० बेस्ट सँडविचेसमध्ये एकमेव भारतीय पदार्थ ‘वडापाव’ला स्थान)
पवार यांनी दोन्ही शिवसेना गटांच्या मेळाव्यांबाबतही भाष्य केले. “बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणाचा अधिकार दोन्ही पक्षांना आहे. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला अधिक लोकांची उपस्थिती होती,” असे पवार म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे ठाकरे गटाला मोठा पाठिंबा असल्याचे संकेत मिळत आहेत. (Sharad Pawar)
उद्धव ठाकरे यांची स्वबळाची भूमिका आणि शरद पवार यांची प्रतिक्रिया यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित होऊ शकतो. शरद पवार यांनी या परिस्थितीत संतुलन राखत आपले मत व्यक्त केले असले तरी, ठाकरे गटाची आगामी निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. (Sharad Pawar)
(हेही वाचा- ‘दारू पिऊन वाहन चालवू नका’चा फलक घेऊन सिग्नलवर उभा राहा ; Bombay High Court तरूणाला शिक्षा)
आघाडीच्या नेत्यांमध्ये समन्वय साधला जाईल की उबाठा स्वबळावर वाटचाल करेल, हे आगामी काळात स्पष्ट होईल. पवार यांनी या परिस्थितीत टोकाची प्रतिक्रिया न देता संवादाचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे महाविकास आघाडीतल्या राजकीय समीकरणांची चर्चा आता चांगलीच रंगली आहे. (Sharad Pawar)