मुंबई प्रतिनिधी:
राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेतृत्वाला पुन्हा एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान शरद पवार गटात (NCP Sharad Pawar group) प्रवेश केलेले फलटणचे रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) आणि संजीवराजे नाईक-निंबाळकर (Sanjivraje Naik-Nimbalkar) आता पुन्हा अजित पवार यांच्या पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Sharad Pawar)
निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात प्रवेश
विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाच्या स्थानिक नेतृत्वावर आरोप करत निंबाळकर बंधूंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शरद पवार गटात प्रवेश केला होता. मात्र, निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना अजित पवार यांच्या पक्षात जाण्याचा मार्ग पत्करायचा असल्याचे संकेत मिळत आहेत.
(हेही वाचा – Maharashtra State : सरकारी कार्यालयांत आता मराठीतच बोला; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय)
सुनील तटकरे यांनी दिले संकेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनीही याबाबत संकेत दिले आहेत. “रामराजे आणि संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत सखोल चर्चा झाली. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. संजीवराजे निंबाळकर बाहेर पडल्यावरही त्यांच्या मतदारसंघात आमचा उमेदवार घड्याळ चिन्हावर विजयी झाला आहे. त्यामुळे त्यांच्या पुनर्प्रवेशाचा निर्णय राज्यसभा सदस्य नितीन पाटील आणि जिल्हा पक्षाध्यक्षांशी चर्चा करून घेतला जाईल,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
रामराजे नाईक-निंबाळकर यांची नाराजी
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीच्या पक्षासोबत होते. मात्र, भाजपाकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याची तक्रार त्यांनी अजित पवार यांच्या समोर केली होती. यावर अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी त्यांचे मत जाणून घेतले असले तरी, ते पक्षात पुनर्प्रवेश करणार का, याबाबत अजून कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.
(हेही वाचा – राहुल गांधी आत्मचिंतन करण्याऐवजी आत्मपराभवाचे जाहीर प्रदर्शन करीत आहेत; ॲड. Ashish Shelar यांचे विधान)
शरद पवार गटाला मोठा धक्का?
यापूर्वीही शरद पवार गटातील काही महत्त्वाचे नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडे वळले होते. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या श.प गटाने विधानपरिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या अधिवेशनाला उपस्थिती लावली होती. त्यामुळे निंबाळकर बंधूंच्या (Nimbalkar brother) संभाव्य पक्षांतराने शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, या घडामोडींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) दोन्ही गटांमध्ये अधिकच अस्वस्थता निर्माण केली आहे. निंबाळकर बंधूंच्या पुढील राजकीय वाटचालीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही पाहा –
h6>
Join Our WhatsApp Community