तुम्ही राहुल गांधी यांना अदानींवर टीका करू नका, असा सल्ला द्याल का, असा प्रश्न शरद पवारांना विचारला, तेव्हा शरद पवार (Sharad Pawar) यांनी, मी असे का करेन, ते काही लहान नाहीत. ते एका पक्षाचे नेते आहेत आणि त्यांचे विचार वेगळे असू शकतात, असे शरद पवार म्हणाले.
इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये शरद पवार बोलत होते. जर तुम्ही सत्तेत आला आणि अदानींसोबत दिसलात तर राहुल गांधी टीका करतील, त्यावर पवारांनी ‘तुम्ही पहालच कसे काम होईल, असे उत्तर दिले. मी अदानींसोबत फित कापण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या अधिपत्याखाली मुंद्रा पोर्ट देशातील सर्वात मोठा पोर्ट बनला आहे. आपला देश तिथून आज बरेच काही आयात-निर्यात करतोय. मग त्यांच्यावर टीका का करावी? तुम्ही राहुल गांधींनाच हा प्रश्न विचारा, असेही पवार (Sharad Pawar) म्हणाले.
(हेही वाचा Marathi : मराठी माणसाने धंदा करावा; नको ते धंदे करु नये)
दिल्लीत काँग्रेसकडे सध्या एकही खासदार नाही. अशा परिस्थितीत केजरीवाल काँग्रेसला आघाडी म्हणून सातपैकी तीन जागा सोडण्यास तयार असल्याचे शरद पवार म्हणाले. विशेष म्हणजे केजरीवालांनीच हे आपल्याला सांगितले. तसेच ईडीच्या कारवाईमुळे इंडियाची आघाडी आणखी मजबूत होईल, असेही पवार (Sharad Pawar) म्हणाले.
Join Our WhatsApp Community