मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे जातीवादी असल्याची टीका केली होती. त्यांच्या या टीकेवरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी त्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले. पण आता खुद्द शरद पवार यांनी याबाबत भाष्य केले आहे. मला जातीवादी म्हणून हिणवलं गेलं त्याचा मी आस्वाद घेतला, असे विधान करत शरद पवार यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
(हेही वाचाः पवार म्हणतात, अनिल देशमुख लवकरच बाहेर येतील)
लोक गांभीर्याने घेत नाही
मी जातावादी असल्याचे विनोदी वक्तव्य ज्यांनी केले त्याचा मी आस्वाद घेतला. या प्रकारच्या विधानांमुळे लोक हसतात. काही लोकांनी याबाबतीत भूमिका घेतल्या पण त्या सौम्य प्रमाणात, अशा आक्रस्ताळेपणे कोणीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे अशा पद्धतीने केलेल्या वक्तव्यांना लोक गांभीर्याने घेत नाही, ऐकतात आणि विसरुन जातात, अशी टीका शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
(हेही वाचाः पार्थ पवार शिवसेनेच्या ‘या’ मतदारसंघातून विधानसभा लढवणार? अजित पवार म्हणतात…)
राज ठाकरेंचा आरोप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील आणि ठाण्यातील सभेत शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. १९९९ साली एनसीपीचा जन्म झाला, तेव्हापासून आमच्या तरुणांची माथी भडकावण्यात येऊ लागली. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर संभाजी ब्रिगेडसारख्या संघटना कशा निर्माण झाल्या, पवार जेव्हा भाषण करतात तेव्हा ते महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकरांचा असेच म्हणतात, पण हा महारष्ट्र सगळ्यात आधी शिवरायांचा आहे, पवार कधीच छत्रपतींचे नाव घेताना दिसत नाहीत, कारण त्यांचे नाव घेतले तर मुसलमानांची मते गेली तर याची त्यांना चिंता वाटते, असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केला होता.
(हेही वाचाः उद्या मीही शिवसेनेच्या जागी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करेन, अजितदादांचा राऊतांना इशारा)
Join Our WhatsApp Community