भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार शरद पवार; Amit Shah यांचा घणाघात

164
पुढील ५ वर्षांसाठी एक ग्रॅमही दुधाची भुकटी आयात करणार नाही; Amit Shah यांचे आश्वासन

विरोधक आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, पण भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार शरद पवार आहेत, त्यांनीच भ्रष्टाचाराला संस्थात्मक करण्याचे काम केले, असा घणाघाती हल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केला. पुण्यात आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

फेक नरेटिव्ह करून विरोधकांनी थोडा बहुत विजय मिळवला, पण आता विधानसभेत त्यांचा खोटारडापणा बाहेर पडेल. बैठकीतील माझे शब्द लक्षात ठेवून घरी जा. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रचंड बहुमतामध्ये महायुतीचे सरकार बनेल. अन् हे सरकार भाजपाच्याच नेतृत्वाखाली बनेल. 2024 मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार आणि युतीचे सरकार येणार आहे, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. 2014 ते 2024 या काळातील तीन निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा भाजपाला मिळाल्या आहेत. तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचे काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने केले आहे. परंतु काही लोकांना अपयश आले तरी देखील राहुल गांधी यांच्यात अहंकार आला आहे. जो जिंकतो त्याचे सरकार असते. भारतात सरकार कुणाचे झाले आणि विरोधी पक्षात कोण बसलं? राहुल गांधी हरल्यानंतर अहंकारीपणाने वावरत आहेत, असेही अमित शाह  (Amit Shah) म्हणाले.

(हेही वाचा Kanwar Yatra Order : दुकानांवर मालकाचे नाव लिहिण्याच्या आदेशाचे Ramdev Baba यांच्याकडून समर्थन, म्हणाले…)

औरंगजेब फॅन क्लबचे नेते उद्धव ठाकरे

स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारस म्हणणारे आता औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनले आहेत, असा हल्लाबोल शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. काँग्रेसवाले अनेक अपप्रचार करत आहेत. परंतु यांनी 60 वर्षांमध्ये गरीबांच्या कल्याणासाठी काय काम केले. हे काहीही करू शकत नाही. आरक्षणाचा अपप्रचार केला. संविधान हटावचा अपप्रचार केला, पण आता त्यांचा प्रचार आता चालणार नाही. लोकांना त्यांचा खोटा अपप्रचार समजला आहे, असेही शाह म्हणाले. शरद पवारांची सत्ता आली की मराठा आरक्षण गायब जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपा सरकार येते, तेव्हा तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे; तर जेव्हा जेव्हा शरद पवार यांचे सरकार आले तेव्हा मराठा आरक्षण गायब झाले. आता पुन्हा देखील मराठा आरक्षण महायुतीच्या सरकारने दिले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम हे भाजपानेच केले आहे, असेही शाह  (Amit Shah) म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत मी भाजपा कार्यकर्त्यांची मेहनत बघितली. याच कार्यकर्त्यांमुळे आपल्याला यश मिळाले. 60 वर्षानंतर पहिल्यांदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले. विधानसभा निवडणुकीत आपला मोठा विजय मिळवायचा आहे. संभ्रम निर्माण करण्याचे काम सध्या विरोधक करत आहेत. राम जनमभूमीसाठी आम्ही वर्षानुवर्ष संघर्ष केला. कुणीही इतकी वर्ष तिथे पाहिले नाही. आम्ही मंदिर बनवून दाखवले. उत्तराखंडमध्ये आम्ही समान नागरी कायदा आणला आता संपूर्ण देश वाट बघतोय. आम्ही आतकवाद संपवून टाकला, असेही शाह  (Amit Shah) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.