विश्वासघाताच्या राजकारणामुळे मतदारांनी शरद पवारांना हद्दपार केले; Ashish Shelar यांचा हल्लाबोल

47
मुंबई प्रतिनिधी 

“विश्वासघाताच्या राजकारणामुळे महाराष्ट्रातील मतदारांनी शरद पवारांना (Sharad Pawar) हद्दपार केले आहे,” असा घणाघाती आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आणि राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत (BJP State Office Press Conference) ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश समन्वयक विश्वास पाठक आणि माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.

शेलार म्हणाले, “शरद पवार यांनी पुलोदच्या निर्मितीबाबत बोलताना जनसंघाच्या मदतीने आपण मुख्यमंत्री झाल्याचे मान्य केले. मात्र, त्या सरकारच्या निर्मितीआधी कोणत्या विश्वासघाताचे राजकारण आणि विचारमंथन झाले, हे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड करावे.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर टीका करताना पवार साहेबांचा राजकीय न्यूनगंड (Sharad Pawar political inferiority complex) दिसून येतो, असे नमूद करत शेलार म्हणाले, “न्यायालयीन प्रक्रियेद्वारे शाह यांना निर्दोषत्व मिळाले आहे. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करत त्यांच्यावर टीका करणे अनुचित आहे.”

(हेही वाचा – स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी Laurene Powell महाकुंभमध्ये झाल्या सहभागी; स्वतःचे नावही बदलले )

शेलार यांनी महाविकास आघाडीवरही टीका करत सांगितले की, “सत्तेच्या लोभासाठी निर्माण झालेली महाविकास आघाडी आता फुटण्याच्या मार्गावर आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही पवारांकडून विश्वासघाताचे धडे घेतल्याचे दिसून आले.” शेलार यांनी महाविकास आघाडीला ‘एक्सपायरी डेट संपलेले’ (Mahavikas Aghadi Expiry date) असे म्हणत, जनतेने विश्वासघाताच्या राजकारणाला मतपेटीतून स्पष्ट उत्तर दिल्याचे ठामपणे सांगितले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.