Sharad Pawar : शिंदे – पवार भेटीत नक्की काय दडलं आहे? धारावी अदानीला देणे की राजकीय डाव टाकणे?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासाठी बैठका सुरू आहेत. त्याचवेळी शरद पवार (Sharad Pawar) हे वारंवार एकनाथ शिंदे यांना भेटून दबावाचे राजकारण करत आहे का?, असा सूर राजकीय वर्तुळात उमटला आहे.

138

निमित्त धारावीचे, ठाकरे + काँग्रेसला डिवचायचे?; की २०१४ च्या प्रयोगाची चाहूल?, असा सवाल विचारायची वेळ शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोघांच्या भेटीमुळे निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासाठी या दोन भेटी सरळ साध्या कारणांसाठी असतीलही, पण पवारांचे या भेटींमागचे हेतू तेवढे साफ आणि सरळ आहेत का?, हा कळीचा सवाल आहे.

दोन दोन भेटीमुळे ठाकरे गटात चिंता

२२ जुलै आणि ३ ऑगस्ट अशा शरद (Sharad Pawar) पवारांनी सलग दोनदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेतल्यामुळे ठाकरे गटात चिंता असल्याची बातमी मराठी माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली. राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर असताना शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सलग झालेल्या दोन भेटी उद्धव ठाकरे यांच्यासाठी लिटमस टेस्ट असल्याचे विश्लेषण ठाकरे गट करत असल्याचे बातम्यांमध्ये म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी उद्योग समुहाला देण्यास कडाडून विरोध केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, तर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे टेंडर रद्द करण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. विशेष म्हणजे काँग्रेसची देखील काही वेगळी भूमिका नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या मैत्रीवर टीका केली आहे, असे असताना शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यातील मैत्रीपूर्व संबंध हा चर्चेचा विषय आहे. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत चर्चा झाली का ?, याची माहिती ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते घेत आहेत.

(हेही वाचा bangladesh violence: बांगलादेशमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर; बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा फोडला)

शरद पवारांचे दबावाचे राजकारण?

दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला. मराठा आरक्षणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली. ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत का ?, याची देखील माहिती ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते घेत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासाठी बैठका सुरू आहेत. त्याचवेळी शरद पवार (Sharad Pawar) हे वारंवार एकनाथ शिंदे यांना भेटून दबावाचे राजकारण करत आहे का?, असा देखील सूर राजकीय वर्तुळात उमटला.

२०१४ ची पुनरावृत्ती होऊ शकते?

२०१४ ला शरद पवार यांनी ज्या पद्धतीत न मागता सरकारला पाठिंबा दिला तसाच पाठिंबा पुन्हा देऊ शकतील अशी भीती देखील आघाडीतील मित्र पक्षांना लागून राहिली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.