“लोकसभ निवडणुकीत शरद पवार यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती होती, असे मला वाटत नाही. फक्त मीडियातील लोकांनाच पवार यांच्याबद्दल राज्यात सहानुभूती असल्याचं वाटतं आणि हेच लोक सतत सहानुभूतीचा धिंडोरा पिटत असतात. शरद पवारांनी आतापर्यंत किती पक्ष फोडले? सगळ्यात जास्त पक्ष फोडण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे, असं मला वाटतं. देशामध्ये पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर पवारसाहेबांना गोल्ड मेडल मिळेल, असा टोला भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे.
(हेही वाचा Paris Olympics 2024 : ऑलिम्पिक पदकाचा रंग एका आठवड्यात उतरला! खेळाडूंना मिळाले नित्कृष्ट दर्जाचे मेडल?)
पक्षांतील महत्त्वाकांक्षांमुळे पक्ष फुटले
देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात लागलेल्या निकालाबाबत आपले विश्लेषण केले. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत शरद पवारसाहेबांनी अतिशय अनुभवाने आपल्या जागा निवडल्या आणि याचे क्रेडिट त्यांना द्यावेच लागेल. कुठे सरकारविरोधात वातावरण आहे, त्याचा अभ्यास करून त्यांनी जागा लढवल्या. विधानसभा निवडणुकीतही ते कमी आणि मोजक्याच जागा लढवतील, असे मला वाटते. परंतु त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात सहानुभूती आहे, असे मला अजिबात वाटत नाही. कारण सहानुभूती असती तर बीडची जागा त्यांनी फक्त ६ हजार मतांनीच का जिंकली? पवारांच्या पक्षाने मतांचे ध्रुवीकरण करून जागा जिंकल्या, असा आरोप फडणवीसांनी केला आहे. पक्षफोडीच्या आरोपाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी पुन्हा आलो, पण यावेळी दोन पक्ष फोडून घेऊन आलो, असे मी एकदाच बोललो आणि तेही गंमतीने बोललो. मात्र आम्ही सातत्याने हे सांगितले आहे की, कोणीही कोणाचे पक्ष फोडू शकत नाही. त्या त्या पक्षांतील महत्त्वाकांक्षांमुळे हे पक्ष फुटले आहेत, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
Join Our WhatsApp Community