राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार sharad pawar यांनी कार्यकर्त्याना २-३ दिवसांचा अवधी मागितला आहे. कारण पवार यांनी मंगळवार, २ मे रोजी कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपण पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, अशी घोषणा केली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या. त्यावर अखेर पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून आपण त्यावर २-३ दिवसांत निर्णय घेऊ असे सांगितले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार sharad pawar यांनी अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला, त्यानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच शरद पवार यांनी जोवर ते निर्णय मागे घेणार नाही, तोवर आम्ही यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बेमुदत उपोषण करणार आहे, असे सांगत सर्वजण उपोषणाला बसले. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि आमदार रोहित पवार हे सिल्वर ओक येथे शरद पवार यांना कार्यकर्त्यांची भावना घेऊन शरद पवारांना sharad pawar सांगायला गेले. त्यानंतर ते पुन्हा कार्यकर्त्यांना येऊन शरद पवार यांचे म्हणणे सांगितले. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, आपण कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण घेतलेल्या निर्णयावर विचार करण्यासाठी २-३ दिवस देण्यात यावेत. तोवर सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी त्वरित घरी जावे. तसेच उस्मानाबाद आणि बीड येथील जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत, ते राजीनामे त्वरित मागे घ्यावे, कुणाचाही राजीनामा मंजूर मेळा जाणार नाही, असे शरद पवारांनी सांगितल्याचे अजित पवार म्हणाले.
(हेही वाचा Sharad Pawar Resigns: शरद पवारांच्या निवृत्तीला कोणाचा विरोध आणि कोणाचे समर्थन)
Join Our WhatsApp Community