मविआच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबाबत Sharad Pawar यांचं मोठं विधान, म्हणाले…

178
मविआच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबाबत Sharad Pawar यांचं मोठं विधान, म्हणाले...
मविआच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबाबत Sharad Pawar यांचं मोठं विधान, म्हणाले...

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विविध नेत्यांचे महाराष्ट्रात सध्या दौरे सुरु आहेत. या माध्यमातून सभा, मेळावे, आढावा बैठका, कॉर्नर सभा घेत आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. दरम्यान या सभेमधून विरोधक सत्ताधाऱ्यांवर गरळ ओकण्याची काम सुद्धा करत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलचं ढवळून निघालं आहे. यामध्येच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जागा वाटपाबाबत खलबतं सुद्धा सुरू आहेत.  (Sharad Pawar)

(हेही वाचा – विधानसभेसाठी मनसेचा सातवा उमेदवार जाहीर; वणीतून Raj Thackeray यांची घोषणा)

मात्र, असं असलं तरी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्यावरून उलटसुलट चर्चा सुरु आहेत. त्यामुळे मविआचा (MVA) मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. आता याबाबत बोलताना शुक्रवार (२३ ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चांबाबत मोठं भाष्य केलं. “आमच्याकडून (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) कोणालाही मुख्यमंत्रि‍पदामध्ये रस नाही. आम्हाला कुणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं नाही”, असं मोठं विधान शरद पवार (Sharad PawarUddhav Thackeray) यांनी केलं. 

(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मा, जय शाह यांनी टी-२० विश्वचषक ठेवला सिद्धिविनायकाच्या चरणी)

महाविकास आघाडीने १८ ऑगस्ट रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मेळावा घेत प्रचारसभांचा नारळ फोडला. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची भूमिका मांडली होती. (Sharad Pawar)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.