शस्त्रक्रियेनंतर शरद पवारांचे पहिले छायाचित्र! सुप्रिया सुळेंनी शेअर केले ट्वीट

शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचे एक छायाचित्र शेअर केले आहे. त्यात ते वर्तमानपत्र वाचताना दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशाच्या राजकारणातले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री शस्त्रक्रिया पार पडली. मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. त्यानंतर त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन त्यांचे रुग्णालयातील एक छायाचित्र शेअर केले आहे.

शस्त्रक्रिया यशस्वी

शरद पवार यांची २९ मार्च रोजी अचानक तब्येत बिघडली. त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासादरम्यान त्यांच्या पित्ताशयात खडा असल्याचे डॉक्टरांना आढळून आले होते. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याने, मंगळवारी रात्री एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या पित्ताशयातील मोठा खडा बाहेर काढण्यात आला. तसेच त्यांना पुन्हा त्रास होऊ नये म्हणून, त्यांच्या पित्ताशयाची आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे आता त्याबद्दलचा निर्णय डॉक्टरांकडून लवकरच घेण्यात येणार आहे. आता शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचे एक छायाचित्र शेअर केले आहे. त्यात ते वर्तमानपत्र वाचताना दिसत आहेत.

(हेही वाचाः रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल! )

काय आहे सुप्रिया ताईंचे ट्वीट?

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा वर्तमान पत्र वाचतानाचे छायाचित्र शेअर करत त्यांनी ब्रीच कॅंडी रुग्णालयाच्या आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत. आजची सकाळ अत्यंत प्रसन्न आहे. आज पवार साहेब त्यांचं रोजचं आवडतं वर्तमानपत्र वाचण्याचं काम करत आहेत. तसेच त्यांची प्रकृती चांगली आणि स्थिर असण्याचे त्यांनी सांगितले. या शस्त्रक्रियेवेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here