- सुजित महामुलकर
सांगलीत (Sangali) लोकसभा मतदार संघासाठी कॉँग्रेसने एवढा आग्रह का धरला आहे? सांगलीत वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांची कॉँग्रेस (Congress) कामकुवत करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) पक्षाच्या खांद्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांची बंदूक आहे का? अशी कुजबूज राज्यातील कॉँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. काय आहे यामागे राजकारण?
कॉँग्रेसमध्ये फूट
यासाठी काही वर्षे मागे जावे लागेल. १९७५ ते १९७७ मधील इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी संपली आणि राज्यात मार्च १९७८ ला विधानसभा निवडणूक झाली. आणीबाणीमुळे कॉँग्रेसमध्ये फूट पडली होती. इंदिरा कॉँग्रेस आणि रेड्डी कॉँग्रेस असे दोन पक्ष निर्माण झाले. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे हे रेड्डी कॉँग्रेसमध्ये होते, तर नसिकराव तिरपुडे इंदिरा कॉँग्रेसमध्ये राहिले. (Sharad Pawar)
पहिले आघाडी सरकार
विधानसभा निवडणुकीत जनता पक्षाला ९९ जागा मिळाल्या तर रेड्डी कॉँग्रेस ६९ आणि इंदिरा कॉँग्रेसला ६२ जागांवर समाधान मानावे लागले तर अपक्ष ३६ निवडून आले. कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळल्याने त्रिशंकु परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी इंदिरा कॉँग्रेस आणि रेड्डी कॉँग्रेस यांनी अन्य लहान पक्षांना सोबत घेऊन आघाडी सरकार स्थापन झाले, ते राज्यातील पहिले आघाडी सरकार. वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) मुख्यमंत्री तर तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. (Sharad Pawar)
(हेही वाचा- IPL 2024 : विराट आणि गौतम गंभीरने जुनं वैमनस्य टाकलं मागे )
शरद पवार ४० आमदारांसाह बाहेर पडले
सरकार दोन्ही कॉँग्रेसच्या (Congress) कुरबुरिसह जूनपर्यंत सुरळीत सुरू होते. जुलैमध्ये तत्कालीन उद्योगमंत्री शरद पवार (Sharad Pawar) हे ४० आमदार घेऊन रेड्डी कॉँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी समाजवादी कॉँग्रेस पक्ष स्थापन केला. त्यामुळे ३-४ महिन्यातच वसंतदादा यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि अवघ्या ३८ व्या वर्षी शरद पवार (Sharad Pawar) जनता दल, शेकाप आणि अन्य पक्षांसोबत ‘पुरोगामी लोकशाही दल’ (पुलोद) सरकारमध्ये मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून ‘शरद पवार यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला’ अशी चर्चा राज्यात सुरू झाली. (Sharad Pawar)
सांगलीतील (Sangali) आणखी एक घटना म्हणजे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (Congress) नेते जयंत पाटील यांचे वडील, तत्कालीन कॉँग्रेस नेते राजारामबापू पाटील आणि वसंतदादा यांचे राजकीय वैर.
(हेही वाचा- Virat Kohli : विराट कोहलीचा षटकारांचा नवीन विक्रम; गेल, धोणी यांना टाकलं मागे )
सांगली उबाठासाठी प्रतिष्ठा?
त्या वसंतदादांचे नातू विशाल पाटील कॉँग्रेस तिकिटावर सांगली लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, मात्र शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) यांनी परस्पर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केली. या भागात कॉँग्रेसच्या उमेदवाराला अनुकूल वातावरण असून विशाल पाटील यांची निवडून येण्याची क्षमता आहे. तर शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) पक्षाची ताकद या मतदार संघात नसतानाही उबाठाकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी प्रतिष्ठेची का केली जात आहे? आणि त्यामुळे स्वाभाविकच यामागे शरद पवार (Sharad Pawar) आहेत का? अशा चर्चा सुरू झाल्या. कॉँग्रेसमध्ये ही कुजबूज होत असल्याचे बोलले जात आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community