राज्यात सध्या सुरू असलेला राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांचा संप सुरू आहे. त्यावर एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता यावर गंभीर इशारा देत एसटी कर्मचाऱ्यांनी योग्य असतील तरच मागण्या कराव्यात. कारण राज्याची आर्थिक स्थिती गंभीर आहे. मागण्या मान्य करणाऱ्यांनीही मागण्यांमागची भावना समजून घ्यावी. मागण्या मान्य करण्यासाठी तुटेल एवढे ताणू नका, असा इशारा दिला.
4 हजार पदे रिक्त आहेत!
काही शिक्षण संस्था चालकांच्या तक्रारी आहेत. शिक्षण खात्याचा अति हस्तक्षेप नको, त्याला मर्यादा हव्या, पण संस्था चालकांनीही तारतम्य ठेवणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. मागच्या सरकारने त्यांच्या कार्यकाळात भरती होऊ दिली नाही. मागच्या सरकारने संस्था चालकांकडे चमत्कारिक नजरेने पाहिले. मागच्या सरकारने अनेक गोष्टी तशाच ठेवल्या. भरती थांबवली. त्यामुळे 4 हजार पदे रिक्त आहेत. रयत शिक्षण संस्था सध्या अनेक समस्यांना तोंड देत आहे. तेव्हा इतर शिक्षण संस्थाना काय अडचणी असतील, याचा अंदाज येतो. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
(हेही वाचा : एसटीच्या जीवावर सुरु आहे रोजगार हमी योजना!)
शिक्षण संस्थांचा अनुदानाचा प्रश्न सोडवा
शिक्षण संस्था चालकांना त्यांच्या मागण्या राज्य सरकारकडे मांडाव्या लागतील. आपल्या बरोबर ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आहेत. त्यांच्या माध्यमातून तुमच्या मागण्या सरकारकडे मांडू. सरकार दखल घेईल. शिक्षकांचे शिष्टमंडळ आपल्या मागण्या घेऊन यायचे. त्यांच्या मागण्या मान्य केल्या की कोट्यवधी रुपयांचा भार येतो. यशवंतराव चव्हाण साहेबांनी मला विचारले, मंत्रिमंडळात तुम्हाला कोणते काम करायचे आहे? मी त्यांना सांगितले ‘शिक्षण खात्यातून माझी सुटका करा, कृषी खाते द्या.’ शिक्षण संस्थांचा अनुदानाचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरविकास, अर्थमंत्री महामंडळ प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेऊन प्रश्न सोडवावा लागेल.
Join Our WhatsApp Community