शरद पवारांचं आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं; Raj Thackeray यांनी मांडला पक्षबदलाचा प्रवास

70
शरद पवारांचं आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं; Raj Thackeray यांनी मांडला पक्षबदलाचा प्रवास
शरद पवारांचं आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं; Raj Thackeray यांनी मांडला पक्षबदलाचा प्रवास

मी अनेकदा भूमिका बदलतो, अशी टीका माझ्यावर केली जाते. मात्र, चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्यात काहीही गैर नाही. त्याला भूमिका बदलणं म्हणत नाही; पण स्वत:च्या स्वार्थासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं याला भूमिका बदलणे म्हणतात. शरद पवारांच्या (Sharad Pawar) बाबतीत बोलायचं झाल्यास त्यांनी बदललेल्या भूमिका बघून भूमिकाही लाजेल. त्यांचं अख्ख आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं”, अशी टीका राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली. ते वरळी येथे संदीप देशपांडे यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत बोलत होते. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा – Jalgaon : गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये स्फोट; चालकामुळे वाचले रुग्णाचे प्राण)

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्या दृष्टीने ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभांमध्ये राजकीय नेत्यांकडून एकमेकांकडून टीका-टीप्पणी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे, अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीतील सभेत बोलताना शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

शरद पवारांनी किती भूमिका बदलल्या ?

“शरद पवार (Sharad Pawar) हे काँग्रेसच्या जीवावर आमदार झाले. पुढे मंत्रीही झाले. त्याच काँग्रेसचे आमदार फोडून जनसंघ आणि इतर पक्षांना घेऊन त्यांनी पुलोद स्थापन केली. इंदिरा गांधी सत्तेत आल्यानंतर पुलोद बरखास्त करून केली. त्यानंतर सहा वर्ष बाहेर राहिले. १९८६ साली त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९८८ साली मुख्यमंत्री बनले. १९९१ ला संरक्षण मंत्री झाले. पुढे १९९९ मध्ये सोनिया गांधींना विदेशी बाई म्हणत काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यानंतर स्वतंत्र निवडणूक लढवली आणि पुन्हा काँग्रेसबरोबर सत्तेत जाऊन बसले. याला भूमिका बदलणं म्हणतात”, असेही राज ठाकरे म्हणाले.

कोणता उद्योगपती पाठीशी आहे ?

या सभेत राज ठाकरे यांनी त्यांनी रिफायनरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनीही लक्ष्य केलं. राज ठाकरे म्हणाले की, “आपल्या कोकणात एक अणू उर्जा प्रकल्प येणार होता. या प्रकल्पाला उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता. मग तो अणू उर्जा प्रकल्प गेला किंवा काम थंड झालं. अणू उर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना कल्पना नाही का? मुंबई हे सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर आहे. या ठिकाणी भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर उभं आहे. १९५९ किंवा १९६० ला ते बांधण्यात आलं आहे. त्यामध्ये न्यूक्लिअर रिअॅक्टर आहे. जर शहराच्या मध्यात ते आहे, तर कोकणातला प्रकल्प बंद करायचा म्हणून कुठल्या उद्योगपतीने तुम्हाला सांगितलं होतं? कारण विरोध करतात, तेव्हा कुठला तरी उद्योगपती मागे असतोच.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.