लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भेटीगाठी वाढवल्या आहेत. अजित पवार गटात गेलेल्या पारनेरचे आमदार निलेश लंके, मनसेला सोडचिठ्ठी दिलेले पुण्यातील नेते वसंत मोरे यांच्याशी भेट घेतल्यानंतर पवार यांनी शुक्रवारी (१५ मार्च) राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याशी चर्चा केली. (Sharad Pawar)
लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) सक्रीय झाले असून त्यांनी महाविकास आघाडीचा विस्तार करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. अजित पवार गटातील आमदार निलेश लंके यांनी काल पुण्यात पवारांची भेट घेतली. लंके लवकरच अधिकृतपणे शरद पवार गटात दाखल होणार आहेत. पुण्यातील वसंत मोरे यांच्यासंदर्भात देखील याच चर्चा आहेत. आज राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. (Sharad Pawar)
(हेही वाचा – Textiles Department : वस्त्रोद्योग विभागाच्या अनुदान योजनांचा लाभ आता ई-टेक्सटाईल पोर्टलवर)
लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत आमच्यात कोणतीही चर्चा नाही – जानकर
माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात शरद पवार आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीत माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आहे. यामुळे हा मतदार संघ जानकर यांना देण्याची मानसिकता शरद पवार यांची आहे. (Sharad Pawar)
आज झालेल्या बैठकीनंतर महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी माहिती दिली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत आमच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. पवारांना मी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. पुढील काही दिवसांत मी पुन्हा सविस्तर भेट घेणार आहे आणि त्यानंतर माझा राजकीय निर्णय जाहीर करणार आहे. (Sharad Pawar)
(हेही वाचा – PM Modi : भाजपाचे ‘मिशन दक्षिण भारत’; ५८ जागांवर लक्ष)
महादेव जानकर शरद पवारांच्या गळाला, पवारांची बारामती सुरक्षित?
महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास त्याचा बारामतीत मोठा फायदा मिळू शकतो. बारामती मतदारसंघात जानकर समर्थक मोठ्या प्रमाणात असून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. यातच शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यानंतर महायुतीत खळबळ उडाली आहे. तर जानकरांनीही महायुतीची साथ सोडली तर बारामतीत सुप्रिया सुळेंचा विजय पक्का मानला जात आहे. त्यामुळे जानकर यांना माढा लोकसभेची उमेदवारी देऊन शरद पवार बारातमीची जागा सेफ करणार का? तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Sharad Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community