संभाजीनगरमध्ये Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

50
संभाजीनगरमध्ये Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
संभाजीनगरमध्ये Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) (Sharad Pawar) प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात (भाजप) जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास तसेच अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे आणि भाजपाचे (BJP) कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची प्रमुख उपस्थिती होती. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला संभाजीनगरमध्ये मोठा धक्का बसला आहे.

( हेही वाचा : पुण्यातील इमामबाराचा ट्रस्टला Waqf दर्जा देण्याचा वक्फ ट्रिब्युनलचा निर्णय Bombay High Court कडून रद्द

या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party- Sharad Pawar) पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये राष्ट्रवादीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, नगरसेविका आणि मध्य विधानसभा महिला मोर्चाच्या अध्यक्षा आशाताई विजय निकाळजे, शहर सचिव अंकुश जाधव, युवक पूर्व विधानसभा अध्यक्ष तुषार अहेर पाटील, उपाध्यक्ष सुरेश अहेर पाटील, माजी नगरसेवक सुभाष परदेशी, मध्य विधानसभा अध्यक्ष फिरोज कुरेशी आणि शहर अध्यक्ष (अल्पसंख्यांक विभाग) अस्लम शरीफ यांचा समावेश आहे. या सर्वांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. (Sharad Pawar )

या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याला संभाजीनगर भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, बापू घडामोडे, बसवराज मंगरूळे, दिलीप थोरात (Dilip Thorat) आणि भाई मुंडे यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाने भाजपच्या स्थानिक पातळीवरील ताकद वाढवण्यास मदत होईल, असे मानले जात आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला मोठा राजकीय फटका बसला असून, आगामी काळात याचा परिणाम स्थानिक राजकारणावर कसा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, भाजपाने (BJP) या पक्षप्रवेशाला मोठे यश मानले असून, आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर दिला आहे. (Sharad Pawar )

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.