राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत वीर सावरकर यांचा अवमान केला. त्यानंतर देशभरात राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उगारली जात आहे. भाजपा, मनसे, बाळासाहेबांची शिवसेना यांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी तर त्यावर प्रतिवाद करताना राहुल गांधी यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिशांच्या सोबत केव्हा आणि कशी सलगी केली याचे पुरावेच सादर केल्यावर देशभरात खळबळ उडाली आहे. आता सावरकर अभ्यासक, अभिनेते शरद पोंक्षे हे थेट तिहार जेलमध्ये पोहचेले आणि ज्या सेल्युलर जेलमध्ये वीर सावरकर यांनी देशासाठी यातना भोगल्या, तसे एक दिवस तरी राहुल गांधी यातना भोगून दाखवाव्यात, असे आव्हान सेल्युलर जेलमधील ‘त्या’ कोठडीतून काढलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
अंदमानातून आवडला तर शेअर करा. pic.twitter.com/UEgw2jtGVK
— SHARAD PONKSHE (@ponkshes) November 18, 2022
काय म्हणाले शरद पोंक्षे व्हिडिओत?
या व्हिडिओची सुरुवात करतानाच शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख मूर्खा असा करत म्हणाले, अरे मूर्खा, कशाला देशभर मुर्खासारखा भटकतोस, त्यापेक्षा अंदमानात सेल्युलर जेलमधील कोठडीत ये, ही सात बाय अकराची कोठडी आहे. छोटीशी चड्डी, कैद्यांचे कपडे, साखळदंड, गळ्यात, हातात बेड्या, अंगभर शिगा, तिथेच झोपायचे, कोपऱ्यातच संडास करायची, तिथेच लघवी करायची, ११ वर्षे तात्याराव राहिले, ब्रिटिशांनी सोडले नाही. गळ्यात बिल्ला होता, त्यावर ‘डी’ लिहिले होते, ‘डी’ म्हणजे डेंजर. कुठल्याही कैद्यावर ‘डी’ लिहिलेले नव्हते. बरळतोस, जरा इकडे ये, ११ वर्षे सोड, ११ दिवस सोड, १ दिवस तुझ्या गळ्यात सगळे अडकवतो, तुला असे अर्ध कच्चे मांसाचे तुकडे, घाणेरडा भात, महारोग्यांच्या हाताने बनवलेले अन्न, त्यातील किडे बाहेर काढून खायचे, त्यामुळे तुला हगवण लागेल, त्यावेळीच तुला कोलूला लावतो. हे सगळं कर एक दिवस, हे सगळं करून दाखव, मग बडबड कर’, असे शरद पोंक्षे म्हणाले.
(हेही वाचा वीर सावरकरांचा अवमान : रणजित सावरकर राज ठाकरेंच्या भेटीला…)
Join Our WhatsApp Community