वीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त शरद पोक्षेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल; म्हणाले, ‘जिवंत समाधी घेणारे शेवटचे युगपुरुष’

168

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मापर्ण दिनानिमित्ताने अनेक दिग्गज नेते, कलाकार सावरकरांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. सावरकरांच्या आत्मार्पण दिनी अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. विश्वरत्न असं सावरकरांना संबोधून शरद पोंक्षेंनी ट्वीट केलं आहे.

या ट्वीटमध्ये शरद पोंक्षे यांनी ‘मराठा’ वृत्तपत्राचं पहिलं पान आणि वीर सावरकरांचा फोटो दिसत आहे. मराठा वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर यांचे स्वर्गारोहण!’ अशा मथळ्याखाली असलेली बातमी दिसत आहे. हे दोन फोटो ट्वीट करत शरद पोंक्षे यांनी लिहिलं आहे की, ‘आज विश्वरत्न स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी. स्वतंत्र भारतात जिवंत समाधी घेणारे शेवटचे युगपुरुष. विनम्र अभिवादन’

दरम्यान यापूर्वीही शरद पोंक्षे यांनी सावरकरांसंबंधित अनेक पोस्ट केल्या असून त्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. तसेच सावरकरांविषयी टीका करण्यांना देखील पोंक्षे परखडपणे उत्तर देत असतात. काही दिवसांपूर्वी वीर सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधींवर शरद पोंक्षेंनी अप्रत्यक्षपणे टीका केली होती. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव दर दोन-तीन महिन्यांनी आपल्याला बातम्या किंवा इतर माध्यमांतून ऐकायला येत. दिल्लीतील अतिशय गाढव आणि मुर्ख मुलगा काहीतरी बरळत असतो. पण मी त्याचा आभारी आहे, कारण हिंदू समाज हा अतिशय थंड समाज आहे. आपल्याला फार वेळ लागतो आणि एकदा का वाद पेटला, की मग आपण कोणाला ऐकत नाही, अशी प्रखर टीका अभिनेते शरद पोंक्षे केली होती.

(हेही वाचा – माझी जन्मठेप : अनोखा रंगमंचीय आविष्कार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.