मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्या उठावानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. आपलीच शिवसेना खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना बळकावण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. याचबाबत शिंदे गटाचे उपनेते शरद पोंक्षे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदुत्वाची टिंगल करणा-या पक्षासोबत शिवसेनेने आघाडी केली तिथेच सगळं संपलं होतं, असे स्पष्ट मत पोंक्षे यांनी व्यक्त केले आहे.
(हेही वाचाः सावरकरांच्या विचारांमुळे हिंदू राष्ट्र निर्माण होण्याची काँग्रेसला भीती- शरद पोंक्षे)
…तिथेच सगळं संपलं
जेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने आघाडी केली तिथेच सगळं संपायला सुरुवात झाली होती. सावरकरांची जो पक्ष टिंगल करतो त्या पक्षासोबत शिवसेना गेली. त्यामुळे बाळासाहेबांनी ज्या विचारांच्या आधारावर शिवसेना उभी केली, तो विचार कुठेतरी सुटत होता. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेना लढली त्याच पक्षांच्या सोबत सरकार स्थापन केलं गेलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत बाळासाहेब नेहमीच आदराने बोलायचे, हिंदुत्वाचा जाहीर पुरस्कार बाळासाहेबांनी केला, याच विचारांची टिंगल करणा-या पक्षांसोबत जाऊन बसणं हे रुचणारं नव्हतं, असं शरद पोंक्षे यांनी केला आहे.
(हेही वाचाः गांधी मेमोरियललाही मानावं लागलं सावरकरांचेच विचार गांधींपेक्षा श्रेष्ठ)
विरोध का केला नाही
महाविकास आघाडीच्या वेळी करण्यात आलेल्या किमान समान कार्यक्रमात जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागण्या मान्य केल्या त्यावेळी सावरकरांचा अपमान करायचा नाही, हिंदुत्वाचा अपमान करायचा नाही, अशी मागणी शिवसेनेनेही करायला हवी होती. भटजी लग्न लावताना जो मंत्र म्हणतच नाही त्याची टिंगल भर सभेत केली जाते आणि मंत्रिमंडळातील मंत्री त्यावर हसतात, याला शिवसेनेकडून कधी विरोध करण्यात आलाच नाही, अशी खंतही शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community