Share Market: शेअर बाजारात शुक्रवारी कोणते निर्देशांक घसरणीसह बंद झाले, वाचा सविस्तर…

कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे शुक्रवारी पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली.

304
Share Market: शेअर बाजार धडाधड कोसळला; अचानक घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे किती नुकसान झाले, जाणून घ्या
Share Market: शेअर बाजार धडाधड कोसळला; अचानक घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे किती नुकसान झाले, जाणून घ्या

शेअर बाजारात शुक्रवार बँकिंग क्षेत्रामुळे उत्साह होता. निर्देशांकात निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स वगळता इतर सर्व निर्देशांक घसरणीसह बंद झाले.

निफ्टी मिडकॅप, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी ऑटो निर्देशांकात घसरण झाली. त्यामुळे शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. सेन्सेक्स १६७ अंकांनी वाढून ७१,५९५वर पोहोचला. निफ्टी ६४ अंकांनी वाढून २१,७८२वर पोहोचला.

शेअर बाजारात चढ-उतार
– कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे शुक्रवारी पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. शेअर बाजारातील आघाडीच्या शेअर्समध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, एसबीआय, अपोलो हॉस्पिटल, अदानी पोर्ट्स, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक आणि हिरो मोटोकॉर्पचे शेअर्स होते.
– तर महिंद्रा अँड महिंद्रा, ओएनजीसी, भारती एअरटेल, एनटीपीसी, हिंदाल्को, टाटा स्टील आणि इन्फोसिसचे शेअर्समध्ये घसरण झाली.
– भारतातील सर्वात मोठी पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइलच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ हे त्याचे कारण आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम आणि बीपीसीएलच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे.

 

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.