नवी मुंबईतील उरणमध्ये झालेल्या एका हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांची आज भेट घेतली. राज्यातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे.मग पोलिसांची दहशत का दिसत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“दोन महिन्यात आरोपीला फाशी झालीच पाहिजे”
यानंतर त्यांनी (Sharmila Thackeray) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “आता तरी शक्ती कायद्याला मंजुरी द्यावी, अशी माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे. असे गुन्हे झाले की त्या आरोपींना फाशीच झाली पाहिजे”, अशी मागणी शर्मिला ठाकरेंनी केली आहे. “दहा वर्ष झाल्यानंतर शक्ती कायदा अमलांत आणला नाही, या वर्षी हा कायदा पास करा. दोन महिन्यात आरोपीला फाशी झालीच पाहिजे. कोणताही आरोपीला सुटला नाही पाहिजे. पोलिसांना या केसेसमध्ये कोणताही राजकीय पक्ष अडवणार नाही. सर्व मुलींच्या रक्षणाची जबाबदारी तुमची आहे. कोणताच पक्ष तुम्हाला अडवणार नाही. तुम्ही तुमची दहशत दाखवा.” असे शर्मिला ठाकरे यावेळी म्हणाल्या.
“…तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाहीत”
“गेल्या तीन दिवसांत तीन मुलींची… किती हिंस्त्रपणा. निर्भया प्रकरणात १६ वर्षांचा मुलगा सुटला हे चूकच आहे. ज्या मुलांमध्ये विकृती आहे, त्यांना फाशी द्या. या लोकांवर पोलिसांची दहशत असलीच पाहिजे. पोलीस काय करु शकतात हे या पुरुषांना कळलं पाहिजे. ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाहीत. त्यामुळे याच वर्षी शक्ती कायदा पास करावा, अशी पंतप्रधानांना विनंती आहे. असे गुन्हे झाले की त्यांना फाशीच झाली पाहिजे.” असे शर्मिला ठाकरे यावेळी म्हणाल्या.(Sharmila Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community