शिवाजी पार्कच्या मैदानावर झालेल्या महायुतीच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला. राम मंदिर, कलम ३७० आणि तीन तलाक असे धाडसी आपण निर्णय घेतलेत, त्याबद्दल राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. सभेनंतर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी पत्रकारांशी बोलताना, ‘बाळासाहेबांची ती इच्छा पूर्ण करा, उबाठाला त्यांची जागा दाखवा’ असं आवाहन जनतेला केलं. (Sharmila Thackeray)
उबाठाला त्यांची जागा दाखवा
शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) म्हणाल्या, “राज ठाकरे यांनी खात्री बाळगली आहे की, नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार, त्यामुळे त्यांनी आधीच महाराष्ट्राच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. बाळासाहेबांनी इच्छा व्यक्त केली होती, की मला जर काँग्रेससोबत जायला लागलं, तर मी माझा पक्ष बंद करेन, बाळासाहेबांची ती इच्छा पूर्ण करा, अशी मतदारांना विनंती आहे. उबाठाला त्यांची जागा दाखवा. बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा. लोकांनी लोकांच्या भल्याचं राज्य आणावं, राज ठाकरेंनी कशावरही टीका न करता, समाजाच्या गरजा व्यक्त केल्या. महाराष्ट्राचं भविष्य चांगलं आहे. गेल्या पाच वर्षातली मोदींची कामं पाहता, जनता त्यांना मतदान करेल.” असा विश्वासही शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केला. (Sharmila Thackeray)
(हेही वाचा –Uddhav Thackeray: राज ठाकरेंच्या मागण्यांवर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ?)
“मोदीजी तुम्ही होतात म्हणून अयोध्येत राममंदिर उभं राहिलं. काश्मीरला विशेष दर्जा देणारा 370 कलम तुमच्यामुळेच हटवलं गेलं. काश्मीर भारताचा भाग आहे हे 370 कलम घटनेनंतर भारतीयांना पहिल्यांदा वाटू लागले. शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पोटगीच्या बाजूने न्याय दिला होता, पण राजीव गांधींनी कायदा संमत करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. पण मोदीजींनी याच पीडित मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाकमधून बाहेर काढलं, त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय कायमचा दूर झाला. त्याबद्दल तुमचं अभिनंदन.” असं राज ठाकरे सभेवेळी म्हणाले होते. (Sharmila Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community