Shashi Tharoor काँग्रेस हायकमांडवर संतापले; म्हणाले, माझी गरज नसेल…

मल्याळम पॉडकास्टमध्ये संवाद साधताना शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी उपरोक्त वक्तव्य केले.

130
शशी थरूर (Shashi Tharoor) हे सध्या काँग्रेसमध्ये नाराज आहेत. हायकमांडला त्यांनी थेट सुनावले. जर हायकमांडला माझी गरज नसेल तर मला काही फरक पडत नाही, मला बाकी दुसरी कामे आहेत, असे शशी थरूर म्हणाले.
 
मल्याळम पॉडकास्टमध्ये संवाद साधताना शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी उपरोक्त वक्तव्य केले. 2026 मध्ये होणाऱ्या केरळ विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या गरजांवर त्यांनी चर्चा केली. केरळमध्ये नेतृत्व स्वीकारण्यात मी इतरांपेक्षा खूप पुढे आहे. काँग्रेस पक्षाला माझा वापर करायचा असेल तर मी पक्षासाठी उपस्थित राहीन. जर त्यांना माझी गरज नसेल, तर मला इतरही कामे आहेत. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, असे तुम्ही समजू नका, असे सूचक विधान शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी केले.
सोनिया गांधी, मनमोहन सिंग आणि केरळ काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या विनंतीवरुन मी अमेरिकेतील आरामदायी जीवन सोडले आणि पूर्णवेळ राजकारणात उतरलो. ही माझी जबाबदारी नाही, पण मी याकडे पक्षाचे लक्ष वेधले आहे. केरळ काँग्रेसमध्ये नेत्याची कमतरता असल्याचेही अनेक कार्यकर्त्यांना वाटते. तिरुअनंतपुरममधील माझे आवाहन पक्षापेक्षा खूप मोठे आहे, असेही शशी थरूर (Shashi Tharoor) म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.