शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ; युवा सेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे पोलिसांच्या ताब्यात

220
आमदार प्रकाश सुर्वे आणि शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्या संबंधीचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी विधिमंडळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याप्रकरणी पोलिसानी ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
साईनाथ दुर्गे हे मुंबई विमानतळावर येताच मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे हा ठाकरे गटाला जोरदार धक्का समजला जात आहे. हा व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. विधान सभेत यावर जोरदार विरोध करण्यात आला या प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलानेही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यामुळे आपल्या वडिलांची बदनामी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेतले आहे. साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जात आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.