‘मृत्यूच्या तावडीतून थोडक्यात सुटलो’; Sheikh Hasina यांचा फेसबुक पेजवरून ऑडिओ संदेश जारी

147
'मृत्यूच्या तावडीतून थोडक्यात सुटलो'; Sheikh Hasina यांचा फेसबुक पेजवरून ऑडिओ संदेश जारी
'मृत्यूच्या तावडीतून थोडक्यात सुटलो'; Sheikh Hasina यांचा फेसबुक पेजवरून ऑडिओ संदेश जारी

बांगलादेश सोडताना जर २० ते २५ मिनीटे उशिर झाला असता तर आमची हत्या निश्चित होती. मी आणि माझी बहिण मृत्यूच्या तावडीतून थोडक्यात बचावलो असे मनोगत बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी व्यक्त केले. यासंदर्भात त्यांनी दि. १७ जानेवारी रोजी रात्री अवामी लीग पार्टीच्या (Awami League Party) फेसबुक पेजवर ऑडिओ संदेश जारी केला आहे.

( हेही वाचा : गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार; Ashish Shelar यांची घोषणा

भारतात आश्रयाला असलेल्या शेख हसीना (Sheikh Hasina) ऑडिओ संदेशात म्हणाल्या की, त्यांचा आणि त्यांची धाकटी बहीण शेख रेहाना यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. मृत्यूला हुलकावणी देत आम्ही तिथून निसटलो. केवळ 20 ते 25 मिनिटांच्या फरकाने आमचा जीव वाचला. अन्यथा आमचा बळी गेला असता.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात बांगलादेशमध्ये (Bangladesh) विद्यार्थी आंदोलन पेटले. या आंदोलनात अनेक संघटना व विरोधी पक्ष देखील सहभागी झाले होते. हे आंदोलन इतके हिंसक बनले की बांगलादेशमधील विविध भागात दंगली उसळल्या. देशातील स्थिती शेख हसीना यांच्या नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे व जनतेचा शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्याविरोधात उद्रेक पाहून हसीना यांनी बांगलादेशमधून पलायन केले. या काळात बांगलादेशात (Bangladesh) झालेल्या हिंसाचारात ६०० हून (सरकारने जाहीर केलेली आकडेवारी) अधिक लोकांचा बळी गेला आहे. शेख हसीना यांनी पलायन केल्यानंतर मुहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार गठित करण्यात आले आहे. युनूस हेच सध्या बांगलादेशचा कारभार पाहत आहेत.

दरम्यान, बांगलादेशमधील (Bangladesh) हिंसाचार व त्यानंतर केलेल्या पलायलनावर शेख हसीना यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की “मला मारण्यासाठी अनेकदा कट रचण्यात आला. गेल्या २१ ऑगस्ट रोजी माझी हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता. कोटलीपारा येथील बॉम्बस्फोटातून मी थोडक्यात बचावले. तसेच ५ ऑगस्ट रोजी देखील मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, अल्लाहच्या आशीर्वादामुळे मी वाचले. त्यांनी (विरोधक) मला मारण्याचा अनेकदा प्रयत्न केल्याचं तुम्ही (जनता) पाहिलंच असेल. परंतु, अल्लाहच्या कृपेने मी अजूनही जिवंत आहे. कदाचित मी काहीतरी दुसरे करावे अशी अल्लाहची इच्छा असेल. परंतु, मला माझ्या देशाची अवस्था पाहून खूप वेदना होत आहेत. माझ्या देशापासून दूर, माझ्या लोकांपासून दूर राहणे, जगणे फार अवघड असल्याचे शेख हसीना यांनी म्हंटले आहे. (Sheikh Hasina)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.