बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी त्या पुन्हा बांगलादेशात परतणार असल्याचे जाहीर केले. अल्लाहने मला कदाचित यासाठीच जिवंत ठेवले आहे. बांगलादेशात हिंसेमध्ये मारल्या गेलेल्या प्रत्येक हुतात्म्याचा बदला घेईल, अशी घोषणा शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी केली.
त्यांनी एका ऑनलाइन सार्वजनिक रॅलीला संबोधित करताना उपरोक्त वक्तव्य केले. शेख हसीना (Sheikh Hasina) म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या हिंसाचारात पोलिस, अवामी लीगचे कार्यकर्ते, बुद्धिजीवी आणि कलाकार मारले गेले. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. युनुसच्या राजवटीत पीडितांचे कुटुंब न्याय मागू शकत नाहीत. मोहम्मद युनूस देश चालवण्यास सक्षम नाहीत आणि त्यांनी स्वतः हे मान्य केले आहे. बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारातून युनूसची नकारात्मकता दिसून येते. जर मृतांचे आता शवविच्छेदन केले गेले तर हे सिद्ध होईल की त्यांचे (हिंसाचारात मारले गेलेले) मृत्यू पोलिसांच्या गोळीबारामुळे झाले नाहीत, असेही शेख हसीना (Sheikh Hasina) म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community