Shigeru Ishiba झाले जपानचे नवे पंतप्रधान

चार वेळा अपयश, पाचव्या प्रयत्नात यश

45
Shigeru Ishiba झाले जपानचे नवे पंतप्रधान
Shigeru Ishiba झाले जपानचे नवे पंतप्रधान

जपानचे नवे पंतप्रधान म्हणून शिगेरू इशिबा (Shigeru Ishiba) यांची वर्णी लागली आहे. पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांची जागा आता इशिबा घेणार असून त्यांच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) नेतेपदाच्या निवडणुकीत २१५ मते मिळवत विजय मिळवला आहे. त्यामुळे जपानच्या (Japan) पुढील पंतप्रधान इशिबा बनणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

(हेही वाचा : Central Govt ने स्थायी समित्या केल्या स्थापन; BJP ११ समित्यांचे अध्यक्षपद भूषवणार)

माजी संरक्षण मंत्री राहिलेल्या इशिबा (Shigeru Ishiba) यांनी साने ताकाइची यांच्या विरोधात विजय मिळवला. ताकाइची यांना १९४ मते मिळाली आहेत. दि. २७ सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणूकीत इशिबा आणि ताकाइची यांच्यात चुरशीची लढाई पाहायला मिळाली. या निवडणुकीत नऊ उमेदवार रिंगणात होते. याआधी इशिबा यांना एलडीपी पक्षाच्या नेतेपदाच्या निवडणुकीत चार वेळा अपयश आले होते. पण पाचव्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं.

शिगेरू इशिबा यांच्याविषयी

दि. ४ फेब्रुवारी १९५७ रोजी शिगेरू इशिबा (Shigeru Ishiba) यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सरकारी अधिकारी तर आई शिक्षिका होती. शालेय शिक्षणानंतर शिगेरू इशिबा (Shigeru Ishiba) कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी टोकियो येथील केयो विद्यापीठात गेले. बँकिंग क्षेत्रात काही काळ काम केल्यानंतर त्यांनी १९८६ मध्ये जपानच्या संसदेत प्रवेश केला. १९८६ मधील ते हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमधील सर्वात तरुण सदस्य होते. त्यांनी टिटोरी प्रीफेक्चरमधून एलडीपीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यानंतर सरंक्षण मंत्री म्हणूनही काम केले. मात्र त्यांच्या कारकीर्दीत त्यांना पक्षातर्गंत मतभेदामुळे अनेकदा डावललं गेलं.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.