राज कुंद्रा ‘असा’ फसवायचा तरुणींना? गुन्हे शाखेने सांगितली मोडस ऑपरेंडी!

या प्रकरणी महाराष्ट्र राज्य सायबर सेलमध्ये 1, मालवणी पोलिस ठाण्यात 2, गुन्हे शाखेत 1 आणि लोणावळा पोलिस ठाण्यात 1 असे गुन्हे दाखल आहेत.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा नवोदित तरुणींना वेबसिरीज किंवा मालिकेत काम मिळवून देतो, असे आमिष दाखवून बोलावून घ्यायचा, त्यानंतर त्यांचे अश्लिल चित्रीकरण करायचा. ते व्हिडिओ अश्लील संकेतस्थळे आणि ऍपला विकायचा, राज कुंद्राच्या कंपनीची अशी मोडस ऑपरेंडी ठरलेली होती. त्याच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत, अशा प्रकारे गुन्हे शाखेने कुंद्राच्या अश्लील धंद्याचा मंगळवारी पत्रकार परिषदेत पर्दाफाश केला.

नातलगांसोबत कुंद्रा करायचा धंदा!

कुंद्रा त्याच्याकडील अश्लील व्हिडिओ ज्या संकेतस्थळ आणि ऍपला विकायचा त्यांच्याकडून सबस्क्रिप्शन घेऊन मेंबरशीप दिली जाते. फेब्रुवारी 2021 मध्ये मालवणी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल होता. या  गुन्ह्याचा तपास केल्यानंतर अशा स्वरूपाच्या अजून काही तक्रारी गुन्हे शाखेकडे प्राप्त झाल्या. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुंद्रा याच्या कंपनीत उमेश कामत नावाचा व्यक्ती हा इंडिया हेड म्हणून काम पाहत होता. राज कुंद्रा यांची व्हीआण नावाची कंपनी आहे, तिचे केंरीन नावाच्या कंपनीसोबत संबंध होते. ती कंपनी राज कुंद्रा याचे नातवाईक चालवत होते. त्यांचे ‘हॉटशॉट’ नावाचे एक ऍप आहे. त्यावर हे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येत होते. ‘हॉटशॉट’ नावाचे अप्लिकेशन सध्या सगळीकडून डाऊन करण्यात आलेले आहे.

पॉर्न रॅकेट प्रकरणी ५ गुन्हे दाखल! 

सोमवारी न्यायालयाची परवानगी घेऊन सर्च ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतरच राज कुंद्रा आणि त्याचे सहकारी यांना अटक करण्यात आली. काही तांत्रिक पुरावे तपासायचे होते. त्याअनुषंगाने तपास सुरू होता. ते पुरावे मिळाल्यानंतर आम्ही राज कुंद्रा याच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यानंतर ही कारवाई केली, असे गुन्हे शाखेने सांगितले. पॉर्न रॅकेट प्रकरणात एकूण 5 गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र राज्य सायबर सेलमध्ये 1, मालवणी पोलिस ठाण्यात 2, गुन्हे शाखेत 1 आणि लोणावळा पोलिस ठाण्यात 1 असे गुन्हे दाखल आहेत. या धंद्यात अजून काही ऍप्लिकेशन आहेत का, याचा तपास करत आहे. या प्रकरणी आतापर्यंत साडेसात कोटी रुपये बँकांमध्ये फ्रीज करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here