साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा २५ हजारांवरून १ लाखापर्यंत वाढविण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. मातंग समाजातील दारिद्र्यरेषेखालील घटकांना त्याचा लाभ होणार आहे.
( हेही वाचा : Virat Kohli Birthday : कोहलीचे टॉप ५ ‘विराट’ विक्रम; बरोबरी करणे अशक्य )
राज्यातील मातंग समाज आणि १२ पोटजातीतील दारिद्ररेषेखालील घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत २५ हजार रुपयांचे कर्ज दिले जाते. या समाज घटकातील जास्तीत जास्त लोकांना कर्ज योजनेचा लाभ घेता यावा, तसेच ही योजना अधिक प्रभावीपणे राबवता यावी, यासाठी तिची मर्यादा वाढविण्याची मागणी केली जात होती. या मागणीची दखल घेत कर्जाची मर्यादा २५ हजारांवरून १ लाखापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्ज फेडण्याची मुदत किती?
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेसाठी शासनाने निकष आखून दिले आहेत. त्यानुसार, कर्जाच्या एकूण रकमेत महामंडळाचा सहभाग ८५ टक्के असेल, १० टक्के अनुदान शासन देईल, तर अर्जदाराचा सहभाग ५ टक्के असेल. या १ लाखाच्या कर्जासाठी ४ टक्के व्याजदर आकारला जाईल. ३६ आठवड्यांत म्हणजेच ३ वर्षांच्या मुदतीत कर्ज फेडणे अनिवार्य आहे.
Join Our WhatsApp Community