विकासासह निसर्ग-पर्यावरण संवर्धनाचा समतोल साधणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

93

निसर्ग संवर्धनात कांदळवन मोलाची भूमिका बजावते. कांदळवन वादळापासून संरक्षण करण्याचे महत्वपूर्ण काम बजावते. आमचे नवे सरकार असले तरीही कांदळवनाप्रमाणे कुठलीही वादळे आणि धक्के सोसू शकतात असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – Har Ghar Tiranga: घरी तिरंगा फडकवायचाय? मग असा हवा झेंड्याचा आकार)

कांदळवन कक्षाकडून आयोजित’आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिन’ निमित्ताने कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनसंवर्धनात आणि शाश्वत विकासात नवे सरकार कटीबद्ध असल्याचा विश्वासही व्यक्त केला.

सरकार लोकहिताची कामे करणार

नवे सरकार हे सामान्य जनतेच्या भल्यासाठीच आहे. त्यामुळे कांदळवनाच्या संरक्षणासह स्थानिकांच्या उपजीविकेच्या बाबतीतही कामे केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. खासगी कांदळवन जमिनीवरही संरक्षणात्मक उपाय करण्याकडे सरकारचचा कटाक्ष असेल. या नव्या सरकारमध्ये विकासासह निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोलही राखला जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. राज्यात 74 टक्क्यांनी कांदळवन क्षेत्र वाढले आहे. निसर्ग आणि माणसाच्या पूरक मैत्रीनेच कांदळवनाचे संरक्षण केले जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

निसर्गाचे संवर्धन करणाऱ्यांच्या पाठीशी सरकार

राज्याने गेल्या काही वर्षात निसर्ग, तौक्ते वादळाचा सामना केला. दिघे आणि दिवेआगार येथील कांदळवन क्षेत्रात वादळामुळे कमी नुकसान पाहायला मिळाले. इतर भागात दहा पटीने नुकसान झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. निसर्ग संवर्धनात शाश्वत विकासासह स्थानिक माणसे आणि संस्था जोडल्यास संघर्ष कमी होतो, या सर्वांच्या पाठीशी आमचे सरकार आहे, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

खासगी कांदळवन क्षेत्राच्या संरक्षणाकडे भर देणाऱ्या उपाययोजना तसेच राज्यात जंगलक्षेत्र आणि वृक्षारोपण आदी उपक्रम राबवले जातील, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. नव्या सरकारच्या काळात शाश्वत विकासावर कामेही केली जातील, असेही फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.