मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यापासून अनेक निर्णय घेतले आहेत. त्यातील एक म्हणजे मेट्रो कारशेड आरेतच बांधण्याचा. महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा कारशेडच्या जागेचा निर्णय बदलला होता. मेट्रो-3 चे कारशेड कांजूरमधील जागी होणार नाही, असे समजताच त्या जागेवर मालकी सागंणा-या विकासकाने आपली याचिका मागे घेतली आहे.
महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा कारशेडच्या जागेचा निर्णय बदलला होता. मेट्रो -3 चे कारशेड कांजूरमधील जागी उभारण्यास मंजुरी दिली होती. विकासक गरोडिया यांनी मुंबई दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मेट्रो कारशेड आरेतच बांधण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील मिळताच गरोडिया यांनी याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून अनेक बदल पाहायला मिळत आहेत.
( हेही वाचा: श्रीमंत घरांमध्येही छळ; हुंडा प्रकरणात उच्च न्यायालयाचे निरीक्षण )
Join Our WhatsApp Community