राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार केला. त्यात १८ मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यानंतर लागलीच मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्ताराची चर्चा सुरु झाली. कारण पहिल्या विस्तारात ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली, त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्ताराची प्रतीक्षा करा, असे सांगितले आहे, परंतु हा विस्तार दिवाळीपर्यंत तरी होईल याची शक्यता दिसत नाही.
दिवाळीपूर्वी दुसरा विस्तार!
त्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी ९ जणांना समावेश करण्यात आला होता. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात मात्र अपक्ष, मित्रपक्षांना सामावून घेण्यात आले नाही. तर शिंदे गटातील अनेकांना यादीत स्थान नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. अशातच दुसऱ्या विस्तारात स्थान दिले जाईल असे आश्वासन शिंदेंनी नाराज आमदारांना दिले. राज्यातील गणेशोत्सव संपल्यानंतर मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होईल असे सांगण्यात येत होते. परंतु आता हा विस्तार दिवाळीपूर्वी होऊ शकतो, असे म्हटले आहे. त्यामुळे मंत्रिपदाची आस लावलेल्यांना आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पहिल्या विस्ताराच्या वेळी अनेक जण होते नाराज
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिंदे गटातील काही आमदार नाराज होते. त्यातील काहींनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्याचसोबत खातेवाटपावरून मंत्रीही नाराज असल्याचे समोर आले होते. दुसऱ्या टप्प्यात २४ मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्यात ७ कॅबिनेट आणि १७ राज्यमंत्र्यांना शपथ दिली जाईल. यात शिंदे गटाला आणखी ४ कॅबिनेट मंत्रिपदे मिळणार अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे शिंदे गटातील नाराजांची दुसऱ्या कॅबिनेट विस्तारात वर्णी लागणार का हे पाहणे गरजेचे आहे.
Join Our WhatsApp Community