8 ते 10 दिवसांत ठाकरे गट रिकामा होणार; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा

123

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊतांवर टीका करताना शिवराळ भाषेचाही वापर त्यांनी केला आहे. संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचे काम सुरु केले आहे. राऊतांच्या बडबडीची ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दखल घेत नाहीत, याचा अर्थ उद्धव ठाकरे यांच्यावर राऊतांचा दबाव आहे, असा आरोपही शिरसाट यांनी केला. तसेच, ठाकरे गट 8 ते 10 दिवसांत ठाकरे गट रिकामा होईल, असा दावा शिरसाट यांनी केला आहे.

राणेंनी केलेल्या वक्तव्याचे शिरसाटांकडून समर्थन

शिंदे गटाचे आमदार संयय शिरसाट यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. शिंदे गटाने उठाव केला तेव्हा मी हेच म्हणालो होतो. शिवसेना संपवण्याचे काम संजय राऊत करत आहेत. संजय राऊत यांना शिवसेना वाढावी असे वाटत नाही, ते शिवसेना संपवत आहेत. राऊत हे आपले अस्तित्त्व टिकवण्याची ही धडपड करत आहेत, असे शिरसाट म्हणाले.

उद्धव ठाकरेंना हे का कळत नाही?

सुषमा अंधारे यांना शांत करण्यात आले आहे. मात्र, संजय राऊत यांचे सुरुच आहे आणि ते शिवसेना संपवल्यावरच थांबतील असे शिरसाट म्हणाले. शिवसेनेतील मोठे नेते संजय राऊत यांच्यामुळे गेले. उद्धव ठाकरे याची का दखल घेत नाहीत ते कळत नाही, असे शिरसाट म्हणाले. संजय राऊत जेलमधून सुटून आल्यावर उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रकारे संजय राऊत यांचे स्वागत केले होते. हे इतिहसात पहिल्यांदा घडले आहे. कोणाला भेटायचे होते तर उद्धव ठाकरेंनी त्या पत्राचाळीतील लोकांना भेटायची गरज होती, असेही शिरसाट म्हणाले.

( हेही वाचा: ‘…तर उद्धव ठाकरे संजय राऊतांना चपलेने मारतील,’ नारायण राणेंचा खळबळजनक आरोप )

सत्तारांनी माझ्यावर कोणतेही आरोप केले नाहीत- शिरसाट

अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी बंडखोरांना जोडो मारतो म्हटले हे शोभत नाही. ते संजय राऊत यांच्या चेल्यासारखे वागत आहेत. शिवसेना डुबवायचे काम सुरु आहे, असा टोला शिरसाट यांनी लावला. अब्दुल सत्तार यांनी माझ्यावर कुठलेही आरोप केले नाहीत. ते माझे मित्र आहेत आणि मुख्यमंत्र्यांना जी तक्रार त्यांनी केली असेल त्यावर मुख्यमंत्री काहीतरी करतील असे शिरसाट म्हणाले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.