राज्य सरकारचा गेल्या महिन्याभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर मंगळवारी पार पडला आहे. यामध्ये शिंदे गटातील 9 तर भाजपमधील 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे मंत्रीपदाची समान वाटणी करण्यात आली आहे. पण यामुळे काही आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबाबतच मंत्रीपदाची शपथ घेतलेले आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हा छोटा मंत्रिमंडळ विस्तार
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी काम करुन गेल्या महिन्याभरात महाराष्ट्राच्या हिताचे असंख्य निर्णय घेतले आहेत. इतक्या जलद गतीने निर्णय घेण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच घटना असेल. पण 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करणार आहोत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री असणे गरजेचे होते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर तातडीने मंत्रिमंडळ विस्तार होणे गरजेचे होते. त्यामुळे हा छोटा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे.
(हेही वाचाः Maharashtra Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांची संपूर्ण यादी)
त्यामुळे जे मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत, ज्यांच्यात काम करण्याची ताकद आहे त्यांना या विस्तारात संधी मिळेलच असे नाही. पण दुस-या मंत्रिमंडळ विस्तारात पूर्ण मंत्रिमंडळ तयार केले जाईल, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
हे 18 आमदार झाले मंत्री
शिवसेना
१) गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण, कॅबिनेट
२) दादा भुसे – मालेगाव बाह्य (नाशिक), कॅबिनेट
३) संजय राठोड – यवतमाळ दिग्रस, कॅबिनेट
४) संदिपान भुमरे – पैठण (संभाजीनगर), कॅबिनेट
५) उदय सामंत – रत्नागिरी, कॅबिनेट
६) तानाजी सावंत – पलांडा (उस्मानाबाद), कॅबिनेट
७) अब्दुल सत्तार – सिल्लोड (संभाजीनगर), कॅबिनेट
८) दीपक केसरकर – सावंतवाडी (सिंधुदुर्ग), कॅबिनेट
९) शंभूराजे देसाई – पाटण (सातारा), कॅबिनेट
भाजप
१) राधाकृष्ण विखे पाटील – शिर्डी (अहमदनगर), कॅबिनेट
२) सुधीर मुनगंटीवार – बल्लारपूर (चंद्रपूर), कॅबिनेट
३) चंद्रकांत पाटील – कोथरूड (पुणे), कॅबिनेट
४) डॉ. विजयकुमार गवित – नंदुरबार , कॅबिनेट
५) गिरीश महाजन – जामनेर (जळगाव), कॅबिनेट
६) सुरेश खाडे – मिरज (सांगली), कॅबिनेट
७) रवींद्र चव्हाण – डोंबिवली, कॅबिनेट
८) अतुल सावे – संभाजीनगर पूर्व, कॅबिनेट
९) मंगलप्रभात लोढा – मलबार हिल, कॅबिनेट