महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले यानंतर राज्यातील सत्तासंघर्षाला पूर्णविराम मिळाला असला तरी ठाकरे गटाची शिवसेना खरी की शिंदे गटाची खरी हा वाद अद्याप मिटलेला नाही. या दोन्ही गटाकडून एकमेकांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी ठाकरे गटाने शिवतीर्थावर तर शिंदे गटाने बीकेसीवर दसरा मेळावा घेतला. त्यानंतर आता शिंदे गटाच्या पहिल्या मध्यवर्ती कार्यालयास अखेर जागा मिळाली असून आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
(हेही वाचा – राज ठाकरे 29 नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर, मनसैनिकांना कोणता कानमंत्र देणार?)
येत्या काही दिवसात बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय सुरू होणार असल्याची चर्चा आहे. मुंबईतील शिवालय या ठाकरे गटाच्या कार्यालयाच्या शेजारी हे कार्यालय असून मंत्रालयाजवळ असणाऱ्या सी-2 या बंगल्यात शिंदे गटाचे पहिले पक्ष कार्यालय असणार आहे. मंत्रालयाच्या समोरील असलेल्या मंत्र्यांच्या निवास्थानी हे कार्यालय सुरू होणार असल्याने दोन्ही गटाचे नेते, पदाधिकारी सातत्याने आता आमने-सामने येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कसं असणार शिंदे गटाचे कार्यालय
शिंदे गटाच्या या कार्यालयामध्ये भव्य सभागृह असणार आहे. यासह नागरिकांसाठी विविध सुविधा देखील त्यामध्ये असणार आहे. या सभागृहाचा वापर पत्रकार परिषद, बैठका आणि मेळाव्यासाठी केला जाणार आहे. या कार्यालयात शिंदे गटाच्या प्रमुखांसह प्रवक्ते आणि विविध पदाधिकाऱ्यांसाठी या कार्यालयात वेगळी केबिन असणार आहे.
Join Our WhatsApp Community