दसरा मेळावा कुणाचा? दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिंदे गटाचा महापालिकेत अर्ज

147

शिवसेनेचा दसरा मेळावा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवतीर्थावर होण्याची एक अतूट परंपरा आहे. या दसरा मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून शिवसैनिक उपस्थिती लावत असतात. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या उठावानंतर आता शिवसेना आणि शिवसेना पक्षावर शिंदे गटाकडून दावा सांगण्यात येत असचानाच आता शिंदे गटाने दसरा मेळाव्यावर देखील आपला हक्क सांगितला आहे. शिंदे गटाकडून येत्या 5 ऑक्टोबरला होणा-या दस-या मेळाव्याला परवानगी देण्यासाठी मुंबई महापालिकेत अर्ज करण्यात आला आहे.

सदा सरवणकर यांचा अर्ज

दसरा मेळाव्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर विभागाला अर्ज करण्यात आला आहे. त्यानंतर आता शुक्रवारी शिंदे गटाचे दादर-माहिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवतीर्थावर सभा घेण्याची परवानगी देण्यासाठी मुंबई महापालिकेला अर्ज केला आहे. दरम्यान या दोन्ही अर्जांनंतर आता महापालिका दसरा मेळाव्यासाठी कोणाला परवानगी देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(हेही वाचाः ‘दस-याला मुंबईत हजर रहा’, शिंदे गटातील आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना! दसरा मेळाव्यावरुन वातावरण तापणार?)

मुख्यमंत्र्यांचे आदेश

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून याआधीच शिंदे गटातील सर्व आमदार-खासदारांना दस-याला मुंबईत हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.