जळगावमधील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी शिवसेनेच्या सुषमा अंधारेंबाबत केलेलं विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे. सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंना समर्थन दिल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने त्यांनी शिंदे गटातील बंडखोरांना डिवचलं होतं. यानंतर किशोर पाटील यांनी जळगावमधील पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे या अंधारात सुद्धा दिसत नव्हत्या, असे वक्तव्य केले.
(हेही वाचा – नक्षलवाद्यांची थेट मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीला लाल शाईत जीवे मारण्याची धमकी!)
सुषमा अंधारे यांची जळगावात सभा होणार आहे. त्याबाबत बोलताना किशोर पाटील यांना प्रश्न करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना किशोर पाटील यांनी सुषमा अंधारेंवर खोचक टीका केली आहे.
काय म्हणाले किशोर पाटील
शिंदे गटातील आमदारांच्या बंडखोरीआधी सुषमा अंधारे यांना महाराष्ट्रात कोणीही ओळखत नव्हते. मात्र जळगावातील सभेसाठी सुषमा अंधारे यांचे मी मनापासून स्वागत करेन असे किशोर पाटील म्हणाले. यासह पुढे ते असेही म्हणाले की, सुषमा अंधारे यांनी 40 बंडखोर आमदारांचे मनापासून आभार मानले पाहिजे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी सुषमाताई अंधारे कोठे आहेत, हे अंधारात सुद्धा दिसत नव्हतं. अशा प्रकारची परिस्थिती अंधारे ताईंची होती.
पंरतु आज आम्ही बंड केल्यानंतर आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रात अंधारे ताई कोण आहेत, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती पडतंय. त्यामुळे त्यांनी आमचे आभार मानले पाहिजे, जर आम्ही बंड केला नसता तर महाराष्ट्राच्या जनतेने अद्याप अंधारे ताईंना ओळखलंच नसतं, असे म्हणत त्यांनी पुन्हा त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Join Our WhatsApp Community