दावोस दौऱ्यावरील आरोपांवरून दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंचा काढला कॉमनसेन्स

101

शिवसेनेचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दावोस दौऱ्यावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे. २८ तासांच्या दावोस दौऱ्यात तब्बल ३५ ते ४० कोटींची उधळपट्टी केल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला असून दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय केलं याचा तपशील जाहीर करण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंनी केलेले आरोप फेटाळले आहेत. तसंच वयामुळे अनुभव नाही हे समजू शकतो. परदेशी गुंतवणूकदारांना भारताशी करार करायचा असतो आणि तो दावोसलाच होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्यांना एवढा कॉमनसेन्स नसेल तर अवघड आहे, असं दीपक केसकर म्हणाले.

मविआपेक्षा आमच्या सरकारनं जास्त गुंतवणूक आणली

दीपक केसरकर म्हणाले की, ‘ज्या लोकांना १४ हजार कोटींची गुंतवणूक आणता आली आणि १ लाख ४० हजार कोटींची गुंतवणूक आणल्यानंतर त्यांच्यावर काहीतरी आरोप करणं हे किती हास्यास्पद आहे. हे महाराष्ट्राची जनता समजू शकते. ठिक आहे, वयामुळे अनुभव नाही, हे समजू शकतो. परंतु रोज काहीतरी बोलायचं आणि स्वतःचं हस करून घ्यायचं. आणि त्यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे, आमच्यासारखी लोकं जी ठाकरे कुटुंबियांचा सन्मान करतात.’

‘एक साध उदाहरण आदित्यला सांगतो. त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत बोलून, खात्री करून घ्यावी. जेव्हा रॉयल कुटुंबांचे गुंतवणूकीसाठी दौरे असतात, तेव्हा चार्टर्ड विमानाचा वापर गेला जातो. जगभरातील लोकं चार्टर्ड विमानानं प्रवास करतात. साधारण तत्व असं असतं की, जिथं चार्टर्ड विमान जाते, ते तिथं थांबतं आणि पुन्हा परत येत. मुख्यमंत्र्यांचं कमर्शिअल विमानाचं बुकिंग होत. पण तांत्रिक अडचणीमुळे त्याला डिले झालं. तांत्रिक अडचणी या कोणाच्या हातात नसतात’, असं केसरकरांनी स्पष्ट केलं.

(हेही वाचा – गद्दार शब्दावरुन ठाकरे-शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची; थोबाड फोडण्याची केली भाषा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.