शिवसेना ऊबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईबाहेर मुक्काम करुन ‘सातच्या आत घरात’ येण्याची परंपरा (tradition) मोडीत काढली तसेच मुख्यमंत्री पदावरून मुक्त झाल्यानंतर त्यांच्या गळ्यातील पट्टादेखील नाहीसा झाल्याची टीका शिवसेनेकडून (शिंदे) करण्यात आली.
मुंबईबाहेरील मुक्काम, चर्चेचा विषय
ठाकरे यांनी २२ जानेवारीला नाशिकच्या (Nashik) काळाराम मंदिरात (Kalaram temple) पूजा करण्यासाठी सहकुटुंब दौरा काढला होता तसेच पक्षाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने एक दिवस नाशकातच मुक्काम केला होता. मुख्यमंत्री पदावर असताना ठाकरे यांनी मुंबईबाहेर रायगड (Raigarh), रत्नागिरीपासून (Ratnagiri) ते थेट नागपूरपर्यंत (Nagpur) दौरे केले मात्र सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंतच. संध्याकाळी ते मुंबईबाहेर कधीही मुक्काम करत नसे. त्यामुळे नाशिकचा मुंबईबाहेरील मुक्काम हा शिवसैनिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता.
थेट चार दिवसांचा कोकण दौरा
यावर शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी टीका करत ठाकरे यांनी असे दौरे आधीच केले असते आणि कार्यकर्त्यांची मानसिकता, भावना समजून घेतल्या असत्य तर पक्षाला फायदा झाला असताच पण पक्षही फुटला नसता असे मत व्यक्त केले. आता ठाकरे यांनी थेट चार दिवसांचा कोकण दौरा आखला असून यात दोन दिवस रायगड आणि २ दिवस रत्नागिरी असा आहे, त्यावरही कायंदे यांनी सडकून टीका केली.
(हेही वाचा हेमंत सोरेन यांच्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांचा लागणार नंबर; ED चे ५वे समन्स)
मुख्यमंत्री असताना, वादळग्रस्त भागासाठी फक्त अर्ध तास
त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री असताना कधी घरातून बाहेर पडला नाहीत, मंत्रालयातही गेला नाहीत आणि मातोश्री मधूनच सगळे कामकाज करत होतात. मुख्यमंत्री असताना हे असे दौरे करून फिरायला हवे होते. कोकणात सलग दोन वर्षे वादळ आले तरी तुम्ही फक्त अर्धा तास वादळग्रस्त भागाला भेट दिली आणि संध्याकाळी परत घरी आलात.”
पट्टा गेला..
“महाविकास आघाडीची सत्ता गेल्यापासून ठाकरे यांनी गळ्यातील पट्टादेखील वापरला नाही, जो पूर्वी होता. त्यामुळे त्यांना काही निर्णय घेण्यापासून कोणी अडवत होते का?” असा सवालही त्यांनी केला.
Join Our WhatsApp Community