शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लक्ष्य केले. 40 खोकासुरांच्या रावणाने हे काम केले म्हणजे आईच्या काळजात कट्यार घुसवल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्या या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 2019 साली भाजपसोबत युतीमध्ये लढलात, त्यानंतर खुर्चीसाठी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडी केलीत. उद्धव ठाकरेंनी अजून स्क्रीप्टरायटर बदललेला नाही. तेच रडगाणे,तीच कथा म्हणत हा सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप म्हस्केंनी केला आहे.
( हेही वाचा हलाल विरोधी आंदोलन संधी, आर्थिक बहिष्कार टाकून आपला पैसा हिंदू व्यापाऱ्यांनाच द्या, रणजित सावरकरांचे आवाहन )
निवडणूक आयोगाने चार वेळा कागदपत्रे दाखल करण्यासाठी उद्धव ठाकरेंना वेळ दिला होता. मात्र, त्यांनी ती दाखल केली नाहीत. शिवसेनेची ही भूमिका पूर्वनियोजित असल्याचा आरोप म्हस्के यांनी केला आहे. उद्धव ठाकरे भाषणात अडीच वर्षे महाराष्ट्राचे रक्त गोठवल्याबाबत काहीच बोलले नाहीत. शरद पवार आणि काॅंग्रेसच्या भूमिकेमुळे पक्षाची काय वाताहत झाली हे त्यांना सांगायला पाहिजे होते, असे म्हस्के यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community