ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंच्या मंगळवारी झालेल्या औरंगाबादच्या महालगावातील कार्यक्रमात गोंधळ उडाला होता. यावेळी आदित्य ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचे आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले होते. यामुळे राजकीय वातावरण तापले. या घटनेची पोलिसांनी दखल घेते आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ केली होती. पण तासांनंतर औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंच्या गाडीवर दगडफेकची घटना झाली नसल्याचे स्पष्ट केले. आता याप्रकरणावरून शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर आरोप केला आहे. सुरक्षेत वाढ होण्यासाठी आदित्य ठाकरेंकडून हल्ल्याचा बनाव रचल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट?
प्रसार माध्यमांसोबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, ‘आदित्य ठाकरेंनी जो दौरा केला आहे, या दौऱ्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. जर कोणत्याही राजकीय नेत्याच्या सभेत अशी घटना घडली, तर त्यांचा आम्ही निषेध करतो. आणि त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी पण असते. परंतु हे लोकं त्या गोष्टीची स्टटंबाजी करायला लागलेत. एकतर कार्यक्रम आयोजित करायचा आणि तो यशस्वी जर झाला नाही, तर स्टटंबाजी करायची हा त्यांचा स्वभाव आहे. हे काही बरोबर नाही. तुम्ही महाराष्ट्रात शांतता असलेले वातावरण जे बिघडवायचा प्रयत्न करताय, तो चुकीचा आहे. कोण तुमच्यावर दगड मारणार आहेत आणि त्याची काय गरज आहे? तुमच्या सभेला कोणता असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय? परंतु अशी स्टंटबाजी करून लोकांमध्ये वातावरण निर्माण करायचे आणि आपले नाव तिथे बिबवायचे, हा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला आहे. लोकांना सुद्धा माहितेय, हा जो प्रकार झालाय, तो मुळात तसा झालेला नाही. हे माझे ठाम मत आहे. सुरक्षा जास्त पाहिजे म्हणून त्यांनी केलेला हा बनाव आहे.’
(हेही वाचा – भाजपमुळे तांबेंचा विजय, आता त्यांनी भाजपमध्येच जाण्याचा निर्णय घ्यावा – राधाकृष्ण विखे-पाटील)
Join Our WhatsApp Community