यामुळे प्राचार्यांना केली मारहाण; व्हायरल व्हिडिओबाबत बांगरांनी दिलं स्पष्टीकरण

115

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा प्राचार्यांना शिवीगाळ करत मारहाण करताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकच चर्चा सुरू झाली. मग विरोधकांनी टीका करण्यास सुरुवार केली. तसंच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबाबत माहिती घेऊन योग्य कारवाई करून असं सांगितलं. असं असताना आता खुद संतोष बांगर यांनी या व्हिडिओ मागचं सत्य सांगितलं आहे.

प्रसारमाध्यमांसोबत बोलताना संतोष बांगरांनी स्पष्टीकरण दिलं की, ‘मारहाण केलेल्या प्राचार्यांनी एका महिलेवर अन्याय केला होता. त्या महिलेची क्लिप सुद्धा आमच्याकडे आहे. आता व्हायरल झालेला व्हिडिओ किमान आठ दिवस झाले आहेत.’

‘दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झालाय, तर का तक्रार दिली नाही. याचा विचार कुठेतरी केला पाहिजे. उठलं सुटलं की, आमदार संतोष बांगरांची दादागिरी. मी त्या दिवशी त्या महिलेसाठी आवाज उठवला. महिलेची इज्जत चव्हाट्यावर येऊ नये, त्यासाठी आम्ही शांत बसलो. आणि अन्यायाविरोधात लढा देणं हे शिवसैनिकाचं काम आहे’, असं बांगर म्हणाले.

या घटनेबाबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले की, ‘शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदारांकडून अशाप्रकारच्या वारंवार घटना घडत आहेत. तसेच भाजप आमदारांकडून घडतायत. सतत सत्तेत बसणारे आमदार, अधिकाऱ्यांना आणि सामान्यांना मारहाण, बळजबरी करताना दिसतायत. पण याचा खूप मोठा परिणाम भाजपच्या मतदातांवर पडताना दिसतोय. भाजपने कोणाशी आघाडी केली आहे, याचा प्रत्यय पदोपदी सर्व आमदार आणून देतायत.’

(हेही वाचा – By Election 2023: कसबा पेठेसह चिंचवडमधून भाजपकडून कोणता उमेदवार लढणार? सांगितलं चंद्रकांत पाटलांनी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.