‘केजरीवाल जितकं काम करतात तितकं काम आपले पालकमंत्री करतात’, शिंदे गटाच्या मंत्र्याचा टोला

175

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली आणि पंजाबनंतर गुजरातवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत मोदी आणि भाजपला धक्का देण्याचा केजरीवाल यांनी चंग बांधला आहे.यासाठी गुजरातमध्ये केजरीवालांनी अनेक दौरे केले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे. केजरीवाल जितकं काम करतात तितकं आपले पालकमंत्री करतात, असा टोला केसरकरांनी लगावला आहे.

काय म्हणाले केसरकर?

शिक्षण, आरोग्य याबाबत दिल्ली मॉडेल जगात प्रसिद्ध असल्याचे सांगत केजरीवाल यांनी पंजाबमध्ये सत्ता मिळवली. त्यानंतर ते आता गुजरातमध्ये मोदींना आव्हान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. याचबाबत केसरकर म्हणाले की, केजरीवाल दिल्लीमध्ये आठवी पर्यंत मोफत शिक्षण देतात, आपल्याकडे दहावी पर्यंतचे शिक्षण मोफत आहे.

(हेही वाचाः सरकारमधील नाराज आमदार माझ्या संपर्कात, मी धमाका करणार! बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीसांना थेट इशारा)

त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत कोणी बदल केले आणि तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम कोणी केले याचा विचार केजरीवाल यांनी करावा. अरविंद केजरीवाल जितकं काम करत असतील तितकं काम आमचे पालकमंत्री करतात, असे विधान दीपक केसरकर यांनी केले आहे. केसरकर यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.